नोकराला 21 लाखांच्या मुद्देमालासह अटक  | पुढारी

नोकराला 21 लाखांच्या मुद्देमालासह अटक 

ठाणे, मिरारोड : माणिकपूर पोलीस ठाणे गुन्हे हद्दीत सोनाच्या कारखान्यामध्ये कारागीर म्हणून नोकरी करत असलेल्या दोन इसम चोरी करून पळून गेल्याची घटना घडली होती. त्याबाबत माणिकपूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. त्याचा तपास करून चोरी केलेल्या नोकराला 21 लाखाच्या मुद्देमालासह अटक केली आहे. महेंद्र राणावत यांच्याकडे सोनाच्या कारखान्यामध्ये कारागीर म्हणून नोकरी करत असलेल्या दोन इसमांनी अंदाजे 25,13,000 रुपये किंमतीच्या 714 ग्रॅम सोन्याची चोरी केल्याची घटना घडली
होती.

त्या गुन्हयाचे अनुषंगाने माणिकपुर पोलीस ठाणे गुन्हे प्रकटीकरण पथकाने तपास करून नजिम सिराज अली मुल्लाह,
अलाऊद्दीन मुन्नाफ शेख यांना हुगळी  पश्चिम बंगाल येथुन अटक करण्यात आली आहे. तसेच त्यांनी चोरी केलेल्या सोन्यापैकी अंदाजे 21 लाख 17 हजार 500 रुपये किंमतीचे सोने जप्त केले आहे.

Back to top button