

ठाणे ; पुढारी वृत्तसेवा : नेपाळ येथे झालेल्या विमान दुर्घटनेत ठाण्यातील एकाच कुटुंबातील चौघे बेपत्ता झाल्याचे समोर आले आहे. अशोक त्रिपाठी (वय 54), वैभवि त्रिपाठी (51),धनुष त्रिपाठी (22), रितिका त्रिपाठी (18) अशी अपघात झालेल्या व्यक्तींची नावे आहेत.
ठाण्यातील कापूरबावडी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील रुस्तमजी सीसायटीत राहणारे त्रिपाठी कुटुंबीय नेपाळला पर्यटनासाठी गेले होते. त्यांचा विमान दुर्घटनेत गंभीर अपघात झाला आहे. या चौघांचा अद्याप शोध लागलेला नाही अशी माहिती पोलीस सूत्रांनी दिली. त्रिपाठी कुटुंबीय हे गेले अनेक वर्षे ठाण्यात वास्तव्यास होते. तर आता त्यांच्या घरी त्यांची 80 वर्षीय आई एकटी आहे.