ठाणे : महागाई हे सर्वसामान्यांपुढील सर्वात मोठे आव्हान : खासदार सुप्रिया सुळे | पुढारी

ठाणे : महागाई हे सर्वसामान्यांपुढील सर्वात मोठे आव्हान : खासदार सुप्रिया सुळे

ठाणे, पुढारी वृत्तसेवा : केंद्राकडून GST परतावा वेळेवर येत नाही, त्यामुळेच महाराष्ट्रासह अनेक राज्यांवर महागाईचे संकट ओढावले आहे. महागाईचे सर्वाधिक चटके हे सर्वसामान्य जनतेला बसत आहेत. असे वक्तव्य करत सुप्रिया सुळे यांनी ठाण्यातील पत्रकार परिषदेत केंद्र सरकारवर निशाणा साधला.

सध्या देशासमोर इतर प्रश्नांपेक्षा महागाईचा प्रश्न हा सर्वात मोठा आणि गंभीर आहे. सर्वसामान्यांनसाठी महागाई हे सर्वात मोठे आव्हान असून यावर लवकर तोडगा काढणे गरजेचे आहे. गॅस सिलिंडर, पेट्रोल-डिझेलसह इतर मुलभूत सुविधांसाठी लागणाऱ्या वस्तूंच्या किंमती गगनाला भिडल्या आहेत. त्यामुळे सामन्य नागरिकांना महागाईच्या झळा सोसाव्या लागत आहेत. त्यामुळे या संकटांचा सामना करत महाराष्ट्र पुढे कसा जाईल यासाठी प्रयत्नशील असल्याचेही सुप्रिया सुळे यांनी सांगितले.

 

 

 

Back to top button