बंदरपाडा : अपहृत मुलीच्या वादातून तरुणाची हत्या करणाऱ्यास अटक | पुढारी

बंदरपाडा : अपहृत मुलीच्या वादातून तरुणाची हत्या करणाऱ्यास अटक

डोंबिवली, पुढारी वृत्तसेवा : पळवून आणलेल्या मुलीच्या वादातून एका १६ वर्षीय तरुणाची त्याच्याच २० वर्षीय मित्राने शेतात नेऊन धारदार कोयत्याने वार करून निर्घृण हत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. ही घटना कल्याण-कसारा रेल्वे मार्गावरील शहाड स्टेशन परिसरातल्या बंदरपाडा येथील शेतात घडली आहे. या प्रकरणी खडकपाडा पोलिसांनी तपास सुरु केला असता पाच तासातच हत्येचा उलगडा करून आरोपीला बेड्या ठोकल्या. शाहरूख यासीन शेख उर्फ इमरान ( वय २०, रा. बनेली-टिटवाळा) असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे.

नाशिकमध्ये महाविकास आघाडीपक्षांतर्फे रास्ता रोको, मलिकांना अटक केल्याचा निषेध

काही दिवसांपूर्वी भिवंडी शहरातून आरोपी शाहरूखने एक मुलगी पळवून आणली होती. या वादातून ८ दिवसांपूर्वी आरोपीला मृतक अरमान व त्याच्या मित्राने बेदम मारहाण केली होती. याच भांडणाचा राग मनात धरून गुरूवारी (दि. २४) सायंकाळच्या सुमारास आरोपीने तरूणाला बहाण्याने दुचाकीवर बसवून शहाड भागातील बंदरपाडा परिसरात असलेल्या शेतात आणले होते. या ठिकाणी आरोपीने तरूणावर कोयत्याने सपासप वार करून त्याची हत्या करून पसार झाला.

जत : तिकोंडी जवळ ऊसतोड मुकादमाचा खून; तिघा संशयितांना अटक

घटनेची माहिती मिळताच खडकपाडा पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक अशोक पवार, पोलीस निरीक्षक सर्जेराव पाटील, पोलीस निरीक्षक शरद झिने, पोलीस निरीक्षक नंदकुमार केंचे, सपोनि अनिल गायकवाड यांच्यासह सुनील पवार, जितेंद्र ठोके, डोमाडे, देवरे, एस. पाटील, लोखंडे, श्रीरामे, बूधकर, कामडी, खांबेकर, थोरात, बोडके, तागड, देसले, वारघडे या पथकाने तत्काळ घटनास्थळी धाव घेतली.
पोलिसांनी पंचानामा करून मृतदेह उत्तरणीय तपासणी रुग्णालयात रवाना केला. सदर घटनास्थळ व आजुबाजूचा परिसर हा शेत तसेच झाडी-झुडपे असल्याने या ठिकाणी पोलिसांनी बारकाईने निरीक्षण करुन प्राप्त झालेल्या मोबाईल फोनवरून मृत तरुणाचे नाव निष्पन्न केले. त्यानंतर गोपनीय माहिती व तांत्रिक कौशल्याच्या आधारे आरोपी शाहरूख याला बनेली- टिटवाळा परिसरातून शिताफीने ताब्यात घेऊन अटक केली. मृत व त्याच्या मित्रांचे आरोपी शाहरूख याच्यासोबत आठ-दहा दिवसांपूर्वी भांडण झाले होते. त्या भांडणाचा राग मनात धरून आरोपीने कोयत्याने हत्या केल्याची कबुली पोलिसांना दिली.

हेही वाचलंत का ?

Back to top button