100th Marathi Sahitya Sammelan : अध्यक्षपदासाठी लिंबाळे, भांड यांच्या नावांची चर्चा

राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या पाठिंब्यामुळे शरणकुमार लिंबाळेंचे पारडे जड
100th Marathi Sahitya Sammelan
100th Marathi Sahitya Sammelanpudhari photo
Published on: 
Updated on: 

ठाणे : पुण्यात नव्या वर्षाच्या प्रारंभाला होऊ घातलेले १०० वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर भव्य-दिव्य होणार की नाही, याच्‍या चर्चा रंगत आहेत. मात्र, पुणे मराठी साहित्य परिषदेतील अंतर्गत धुसफुस आणि अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाच्या अध्यक्षांच्या व्यस्ततेमुळे गोव्यात झालेल्या बैठकीत अध्यक्षपदाच्या नावांची चर्चाही झाली नाही.

येत्या मंगळवारी (दि. २४) होणार्‍या महामंडळाच्या बैठकीत १०० व्या साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदासाठी दलित साहित्यिक शरणकुमार लिंबाळे यांच्या नावावर शिक्कामोर्तब होण्याची शक्यता आहे. मराठवाड्यातील ज्येष्ठ कादंबरीकार बाबा भांड यांचेही नाव चर्चेत असले, तरी अध्यक्षपदाची माळ लिंबाळे यांच्या गळ्यात पडावी यासाठी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा महामंडळावर अप्रत्यक्ष दबाव असल्याची चर्चा साहित्य वर्तुळात रंगत आहे.

100th Marathi Sahitya Sammelan
Ahilyanagar Fake Burglary Case: ट्रेडिंगमध्ये फसला अन्‌ घरफोडीचा बनाव रचला; फिर्यादीच निघाला आरोपी

महामंडळाचे दफ्‍तर पुण्याला गेल्यापासून पुणे महाराष्ट्र साहित्य परिषदेत वादाचा अंक दिवसागणिक रंगतो आहे. त्यातच पुणे ‘मसाप’च्या ३१ पैकी २१ सदस्यांनी अध्यक्ष योगेश सोमण, कार्यवाह स्वाती महांळक आणि कोषाध्यक्ष प्रदीप निफाडकर यांच्याविरोधात अविश्वास ठराव दाखल केला आहे.

या तिघांना महामंडळात बेकायदेशीररीत्या काम करायचे असल्याने त्यांनी कार्यकारी मंडळाची सभा बोलावण्यास उशीर केल्याचा आरोप २१ जणांतील काही सदस्यांनी केला आहे. या सदस्यांनी महामंडळाच्या उपाध्यक्षाकडे ज्येष्ठ पत्रकार विजय कुवळेकर, रमेश पतंगे आणि बाबा भांड यांची नावे अध्यक्षपदासाठी सुचविली आहेत.

100th Marathi Sahitya Sammelan
Samruddhi Expressway : समृद्धीवरील वाहनावर दगडफेकीच्या घटनेनंतर पोलिस आयुक्तांकडून पाहणी

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.