ठाणे लोकसभा मतदार संघात 1 लाख 66 हजार बोगस मतदान झाले : राजन विचारे

जिल्हाधिकाऱ्यांच्या बैठकीत माजी खासदार विचारे यांनी अधिकाऱ्यांना विचारला जाब
Thane News
जिल्हाधिकाऱ्यांच्या बैठकीत माजी खासदार विचारे यांनी अधिकाऱ्यांना विचारला जाबPudhari Photo
Published on
Updated on

ठाणे : पुढारी वृत्तसेवा

ठाणे लोकसभा मतदार संघात 1 लाख 66 हजार बोगस मतदान झाले. बोगस मतदारांबद्दल तक्रार करूनही तक्रारीची दखल घेतली जात नसल्याचा गंभीर आरोप करत, ठाणे लोकसभेचे माजी खासदार राजन विचारे यांनी ठाणे जिल्हाधिकाऱ्यांच्या बैठकीत अधिकाऱ्यांना जाब विचारला. आपल्याकडे सर्व पुरावे असून एकदा माफ करेन परत माफ करणार नाही असा इशाराच जिल्हाधिकारी अशोक शिनगारे यांच्या समोरच अधिकाऱ्यांना दिला.

Thane News
राष्ट्रपती निवडणूक : शिवसेनेकडून भावना गवळींची लोकसभा प्रतोदपदावरून उचलबांगडी! राजन विचारे यांची नियुक्ती

उद्धव ठाकरे यांची ठाण्याच्या गडकरी रंगायतन येथे जाहीर सभा होणार असून या सभेच्या एक दिवस आधीच राजन विचारे यांनी आक्रमक भूमिका घेत अधिकाऱ्यांना खडसावले. बोगस मतदार नोंदणी, मतदार नोंदणीसाठी पैसे घेतले जात असल्याचा आरोप करत राजन विचारे यांनी यासंदर्भात जिल्हाधिकारी कार्यालयात तक्रार दाखल केली होती. मात्र त्यांच्या तक्रारीची दखल घेतली गेली नव्हती.त्यामुळे राजन विचारे यांनी जिल्हाधिकारी कार्यालयात जिल्हाधिकारी अशोक शिनगारे यांची यांची भेट घेऊन बैठक अधिकाऱ्यांना यासंदर्भात जाब विचारला.

Thane News
रत्नागिरी : चिपळूणमध्ये विचारे आणि सुर्वे यांच्या विवाहाची लग्नपत्रिका चर्चेत

लोकसभेच्या निवडणुकीत बोगस मतदार नोंदणी झाली होती. मीरा भाईंदर मध्ये34 हजार नावे दुबार होती.ओवळा माजीवडा मतदार संघात 29 हजार 82 , कोपरी 21 हजार ,ठाणे 16,700, ऐरोली 39 हजार , बेलापूर 25 हजार असे एकुन 1 लाख 66 हजार दुबार नावे होती.संध्याकाळी 5 नंतरही मतदान करण्यात आले.त्यामुळे 1 लाख 66 हजार दुबार मतदान झाले असल्याचा आरोप राजन विचारे यांनी केला आहे.यासंदर्भात जिल्हाधिकारी यांना संपूर्ण यादी आम्ही दिली असल्याची माहिती विचारे यांनी दिली.याचा पर्दाफाश आम्ही केला आहे.लोकसभेला तुम्ही हे काम केलं मात्र विधानसभेत जर हा प्रकार केले तर याद राखा , विधानसभेला हे खपवून घेणार असा इशाराच विचारे यांनी अधिकाऱ्यांना दिला आहे.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news