रत्नागिरी : चिपळूणमध्ये विचारे आणि सुर्वे यांच्या विवाहाची लग्नपत्रिका चर्चेत

रत्नागिरी : चिपळूणमध्ये विचारे आणि सुर्वे यांच्या विवाहाची लग्नपत्रिका चर्चेत
Published on
Updated on

चिपळूण, पुढारी वृत्तसेवा

हात रुमालावर लग्न पत्रिका!… हो लग्न पत्रिकेचा कागद आता कालबाह्य होऊ लागला असून त्याची जगा रुमालाने घेतली आहे… रूमाळावर छापलेल्या लग्न पत्रिकेचा नवा ट्रेंड आता कोकणात चिपळूण मधून सुरू झाला. त्यामुळे ही पत्रिका औत्सुक्याची आणि चर्चेची ठरली आहे…

कोरोना काळात लग्न समारंभ आणि विविध कार्यक्रमावर निर्बंध आले होते त्यामुळे असे कार्यक्रम मोजक्या लोकांत आणि कमी खर्चात केले गेले. मात्र निर्बंध हटवल्यानंतर काही अटींवर लग्नाचे कार्यक्रम पुन्हा सुरू झालेत.

सध्या लग्नसराई सुरू झाली आहे. अनेक ठिकाणी धुमधडाक्यात लग्नसोहळे केले जातायत. या पार्श्वभुमीवर बाजारात आकर्षक आणि महागड्या लग्नपत्रिकाही दाखल झाल्या आहेत. दहा रुपयांपासून ते अगदी दहा हजारांपर्यंत लग्नपत्रिका मिळू लागल्या आहेत. कागदावर असलेल्या या पत्रिका विविध प्रकारच्या असून, प्रत्येक जण आपापल्या पद्धतीने खरेदी करतोय.

मात्र कितीही किंमती पत्रिका असली तरी शेवटी तो कागदच असल्याने आणि त्याचा अन्य काहीच उपयोग होत नसल्याचे दिसून येतंय. त्यामुळेच कोसबी येथील प्रणाली विचारे हिने नामी शक्कल लढवत, लग्नानंतरही पत्रिका वापरता यावी यासाठी चक्क हातरुमालावरच पत्रिका छापून घेतली आहे.

हि पत्रिका त्यांच्याकडून एका छोट्या बॉक्समध्ये पॅक करून दिली जात आहे. तो बॉक्स हातात आल्यावर आतमध्ये पत्रिका कशी असेल याची उत्सुकताही आमंत्रितांच्याही चेहऱ्यावर पहायला मिळते. हा बॉक्स उघडला असता, आत मध्ये निमंत्रणाचा मजकूर छापलेला रुमाल दिसून येतो. विशेष म्हणजे हा रुमाल पाण्यात ठेवताच त्यावर केलेली छपाईही निघून जाते. आणि तो हातरुमाल आपल्याला नेहमीच्या वापरता घेता येतो.

अशी अनोखी शक्कल लढवत लग्नपत्रिकेचा एक वेगळाच फंडा कोकणातील चिपळूणमधून सुरवात झाल्याचं पहायला मिळतं.
कोसबी येथील प्रणाली विचारे आणि कुचांबे येथील सुरेंद्र सुर्वे यांची ही आगळी वेगळी लग्नपत्रिका चिपळूणमध्ये चर्चेचा विषय ठरली आहे. त्यामुळे कमी खर्चातील ही पत्रिका कोकणात चांगलाच भाव खात आहे.

हेही वाचा

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news