सोलापूर : सकाळी साडेआठ ते सहा यावेळेत सेतू कार्यालय आता सुरू राहणार

सोलापूर :  सकाळी साडेआठ ते सहा यावेळेत सेतू कार्यालय आता सुरू राहणार

सोलापूर; पुढारी वृत्तसेवा :  सेतू कार्यालयात सध्या सर्व्हर डाऊनमुळे नागरिकांची गैरसोय होत असल्याच्या तक्रारी वाढल्या आहेत. पालकांनी निवासी उपजिल्हाधिकार्‍यांची भेट घेऊन यावर तोडगा काढण्याची मागणी केली होती.त्यावर दै. 'पुढारी'ने याचे वृत्त प्रसिध्द केले होते. त्याची दखल घेऊन सेतू प्रशासनाने आता सेतू कार्यालयाच्या वेळेत बदल केला असून आता सकाळी साडेआठ ते सहा वेळेत सेतू कार्यालय सुरू ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. सकाळच्या सत्रात सर्व्हर चांगले चालते. त्यामुळे आलेल्या अर्जदारांचे अर्ज वेळेत अपलोड होत आहेत.त्यामुळे कामाचा निपटाराही वेळेत होत असल्याचे सेतूचालक सुरवसे यांनी सांगितल आहे.

सध्या नव्याने शैक्षणिक वर्षाला सुरुवात झाली आहे. त्यामुळे विविध दाखले काढण्यासाठी नागरिकांची मोठी गर्दी पडत आहेत. सर्व्हर डाऊन असल्याने वेळेवर अर्ज अपलोड होत नसल्याच्या तक्रारींमध्ये कमालीची वाढ झाली होती. त्यामुळे नागरिक वैतागले होते. याचे वृत्त दै. 'पुढारी'ने प्रसिद्ध केले होते. याची दखल घेऊन निवासी उपजिल्हाधिकारी शमा पवार यांनी वेळेत बदल करण्याच्या सूचना दिल्या होत्या.

त्यानुसार आता सेतू कार्यालय सकाळी साडेआठ ते सहा यावेळेत सुरू राहणार असल्याने जिल्ह्यातील सर्व नागरिकांनी याची दखल घ्यावी आणि आपली विविध कामे वेळेवर करून घ्यावीत, असे आवाहन जिल्हा प्रशासनाच्यावतीने करण्यात आले आहे. या वेळेच्या बदलामुळे नागरिकांची सोय झाली असून ऑनलाईन कामकाजही सुरळीत झाले असल्याचे सेतू प्रशासनाच्यावतीने सांगण्यात आले आहे.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news