सोलापूर जिल्ह्यातील डाळिंब, ज्वारी सातासमुद्रापार; 20 फळे अन् भाजीपाल्यांना मिळाले जीआय मानाकंन

सोलापूर जिल्ह्यातील डाळिंब, ज्वारी सातासमुद्रापार; 20 फळे अन् भाजीपाल्यांना मिळाले जीआय मानाकंन

सोलापूर; पुढारी वृत्तसेवा : सोलापूर जिल्ह्यातील डाळिंब आणि ज्वारीच्या पिकाला भारत सरकारचे जीआय चिन्हांकन मिळाले आहे. त्यामुळे या दोन पिकांची महती आणि ओळख आता सातासमुद्रापलीकडे जाणार आहे.तसेच या पिकांना आता जागतिक बाजारपेठ खुली झाली आहे.

जागतिक व्यापार संघटनेमार्फत व्यापार करारांर्तगत विविध करार करण्यात आले आहेत. त्यातीलच एक महत्त्वाचा करार म्हणजे व्यापार संबधित बौध्दिक मालमत्ता अधिकार हा आहे. हा करार उत्पादनाचे पेटंट डिझाईन आणि त्याची भौगोलिक चिन्हांकन व ट्रेडमार्क नोंदणी करण्यासाठी उपयुक्त ठरत आहे. त्यामुळे आता सोलापूरच्या डाळिंबाला आणि ज्वारीलाही जागतिक बाजारपेठेत आपले स्थान निर्माण करण्याची संधी मिळणार आहे.

जीआय अर्थात भौगोलिक चिन्हांकन ही एक प्रकारची मानांकन नोंद आहे, जी भौगोलिक क्षेत्राशी निगडीत आहे. नैसर्गिकरीत्या व मानवी प्रयत्नांतून उत्पादित होणार्‍या कृषी मालाची ओळख त्यामधील खास गुणवत्तेतील सातत्य व त्याच्यामध्ये असणारे विशेष गुणधर्मार्ंचे जतन करण्यासाठी हे चिन्हांकन उपयुक्त असते. तसेच भौगोलिक चिन्हांकन प्राप्त झालेल्या फलोत्पादन पिकांचे ब्रँडिंग करुन त्याची विक्री व निर्यातीकरिता अधिकृत वापर करता म्हणून नोंदणी केली जाते. भौगोलिक क्षेत्राशी निगडीत मालास कायदेशीर संरक्षण प्राप्त होते. भौगोलिक चिन्हांकन मालास निर्यातीसाठी अधिक संधी उपलब्ध होतात. अशा नोंदणीकृत कृषी मालास राष्ट्रीय तसेच आंतरराष्ट्रीय पातळीवर ब्रँडिंग करण्यास मदत होते. व्यापारी चिन्हाला बाजारपेठेत जे महत्त्व असते, तेच महत्त्व कृषीमालाच्या भौगेालिक चिन्हांकनास असते. त्यामुळे अशी नोंदणी केलेल्या उत्पादनाच्या उत्पादकाला जास्तीचे आर्थिक उत्पन्न मिळू शकते.

अशी आहे नोंदणी करण्याची पद्धत…

भौगेालिक चिन्हांकित पिकांकरिता अधिकृत वापरकर्ता म्हणून नोंदणी करण्यासाठी जीआय 3 एमध्ये अर्ज दाखल करावा लागता. त्यासाठी अर्जासोबत सातबारा उतारा तसेच त्या दर्जाचे उत्पन्न करण्यात येत असल्याचे शेतकर्‍यांचे हमीपत्र द्यावे लागते. हे प्रमाणपत्र शेतकर्‍यांना किमान दहा वर्षांसाठी दिले जाते. त्यासाठी रजिस्टार जिओग्राफिकल इंडिकेशन रजिस्ट्री ऑफिस इंटलेक्युअल यांच्याकडे पाठविल्यानंतर छाननीनंतर शेतकर्‍यांना हे प्रमाणपत्र दिले जाते.

फळपिकांना मिळाले भौगोलिक चिन्हांकन

महाराष्ट्र राज्यातील विविध प्रकारच्याएकूण 20 फळे आणि भाजीपाला पिकांना हे भौगोलिक चिन्हांकन चेन्नईकडून मिळाले आहे. यामध्ये महाबळेश्वर-स्ट्रॉबेरी, नाशिकची- द्राक्ष, नागपूरची-संत्री, लासलगाव-कांदा, जळगाव-वांगी आणि केळी, सासवड-अंजीर, सोलापूर-डाळिंब, सांगली-बेदाणा, जालना – मोसंबी, बीड-सीताफळ, वेंगुर्ला-काजू, घोळवड-चिकू, मराठवाडा-केशर आंबा, कोणक-हापूस आंबा, सांगली-हळद, सातारा -वाघ्या घेवडा, रत्नागिरी व सिंधुदुर्ग-कोकम, भिवापूर -मिरची, वायगाव-हळद या पिकांना आणि भाज्यांना जीआय मानांकन मिळाले आहे

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news