सोलापूर : माळशिरस तालुक्यातील तीन ग्रामपंचायतींचा निकाल हाती

सोलापूर : माळशिरस तालुक्यातील तीन ग्रामपंचायतींचा निकाल हाती
Published on
Updated on

सोलापूर; पुढारी वृत्तसेवा :  जिल्ह्यातील 177 ग्रामपंचायतींचे सरपंच, सदस्य निवडीसाठी रविवारी झालेल्या मतदानाची मोजणी मंगळवारी (दि. 20) आज तालुक्याच्या ठिकाणी होत आहे. सकाळी साडेआठनंतर मतमोजणीला सुरुवात झाली आहे.

Solapur Gram Panchayat Election Results Live : माळशिरस तालुक्यातील  तीन ग्रामपंचायतींचा निकाल हाती

माळशिरस तालुक्यातील मतमोजणीस प्रारंभ झाला असून तीन ग्रामपंचायतीची मतमोजणी पूर्ण झाली आहे. पुरंदावडे ग्रामपंचायतमध्ये राणी बापू मोहिते या सरपंच म्हणून निवडून आल्या आहेत. चौडेश्वरवाडी ग्रामपंचायतमध्ये अलका इंगवले देशमुख व चांदापूरी ग्रामपंचायतीमध्ये जयवंत सुळ हे सरपंच पदी विजयी झाले आहेत.

दरम्यान, प्रशासकीय यंत्रणाला कामाला लागली आहे. अनुचित प्रकार घडू नये यासाठी पोलिस यंत्रणा सज्ज आहे. जिल्ह्यात शांतता अबाधित रहावी यासाठी विजयी मिरवणूक, रॅलीला पोलिसांनी प्रतिबंध केला आहे. मोठ्या ग्रामपंचायतींमध्ये अनेक पक्षांच्या वरिष्ठ नेत्यांची प्रतिष्ठा पणाला लागली आहे. त्यामुळे मतदानाच्या टक्केवारीत सुमारे दहा टक्क्यांनी वाढ झाली. त्यातच यंदा सरपंचपदाची निवडणूक थेट जनतेतून होत आहे. पॅनेल प्रमुखांनी आपलेच पॅनेल निवडून येणार तसेच सरपंच आपल्याच गटाचा होणार, असा दावा केला आहे.

 येथे होत आहे मतमोजणी

– करमाळा, माढा, मोहोळ, पंढरपूर, सांगोला, अक्कलकोट ः संबंधित तहसील कार्यालय
– बार्शी ः उपळाई रस्त्यावरील शासकीय धान्य गोदाम
– उत्तर सोलापूर ः सोलापुरातील डफरीन चौकातील नूतन मराठी विद्यालय
– माळशिरस ः म्हसवड रस्त्यावरील नवीन शासकीय धान्य गोदाम
– मंगळवेढा ः शासकीय धान्य गोदाम
– दक्षिण सोलापूर ः सोलापुरातील नॉथकोट प्रशाला

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news