सोलापूर : अशैक्षणिक कामे बंद करा

शैक्षणिक
शैक्षणिक

सोलापूर : पुढारी वृत्तसेवा : शिक्षकांवर सातत्याने अशैक्षणिक कामे सोपविण्यात येत आहेत. अध्यपनाशिवाय या कामांचा अतिरीक्‍त ताण शिक्षकांवर असताना आता निवडणुकीची कामेही शिक्षकांवर सोपविण्यात येत आहेत. शिक्षकांवरील अशैक्षणिक कामे बंद करण्यात यावीत, या प्रमुख मागणीसाठी सोमवारी गुरुसेवा शिक्षक परिवाराच्या वतीने जिल्हा परिषदेसमोर धरणे आंदोलन करण्यात आले.

करमाळा तालुक्यातील कावळवाडी येथील शिक्षक चंद्रहास शिंदे यांची बदली रद्द करण्यात यावी, वेतन दरमहा 1 तारखेस वेळेवर व्हावे, प्रलंबित प्रश्नासंदर्भात बैठक आयोजित करण्यात यावी. शिक्षकाचे भविष्य निर्वाह निधी ,अग्रिम प्रकरणे व वैद्यकीय प्रतीपूर्तीची प्रकरणे मंजूर होण्यासाठी कालमर्यादा निश्चित करण्यात यावी, आदीसह अन्य 13 मागण्या यावेळी करण्यात आल्या. या आंदोलनात शिक्षक संघाचे नेते शिवानंद भरले, म. ज. मोरे, विरभद्र यादवाड, राजकुमार राऊत, सुर्यकांत हत्‍तुरे, हरिष कडू, रामचंद्र बिराजदार, इकबाल नदाफ, विजय लोंढे, बा. दा. मुल्ला, विद्याधर शिवशरण, नवनाथ धांडोरे, सिध्दाराम चौधरी, बाबासाहेब दराडे, सरस्वती भालके, चंदाराणी आतकर, भाग्यश्री सातपुते यांच्यासह अन्य शिक्षकांनी सहभाग घेतला.

आंदोलकांच्या टोपीने वेधले लक्ष
या आंदोलनातील प्रत्येक शिक्षकाच्या डोक्यावर एका बाजूला गुरुसेवा परिवार आणि दुसर्‍या बाजूला एकच मिशन जुनी पेन्शन असे घोषवाक्य असलेली टोपी घालण्यात आली होती. त्यामुळे पतसंस्थेच्या निवडणुकीच्या पार्श्‍वभूमीवर हे आंदोलन तर करण्यात आले नाही ना असा प्रश्‍न उपस्थित नागरिकांतून करण्यात येत होता.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news