सोलापूर : अनैतिक संबंधातून तरुणाचा खून

सोलापूर : अनैतिक संबंधातून तरुणाचा खून
Published on
Updated on

सोलापूर, पुढारी वृत्तसेवा : अनैतिक संबंधाच्या कारणावरून येथील कलावतीनगरात भरवस्तीत वैकुंठाचानी ऊर्फ कल्याणी काटाराजा देवर (वय 31, रा. सुनीलनगर) याचा कोयत्याने सपासप वार करून खून केला. भावकीतील तरुणांनीच रविवारी (दि. 16) रात्री 11 वाजण्याच्या सुमारास दशहत माजवत हा प्रकार केला.

याप्रकरणी मृत कल्याणीचा भाऊ राजेश देवर याने एमआयडीसी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली. त्यावरून संशयित महेश देवर, कामाची देवर व शिवा देवर (तिघे रा. सुनीलनगर) या तिघा भावांविरुद्ध गुन्हा दाखल झाला आहे.

मृत व आरोपी सर्वजण मूळचे कर्नाटकातील असून, एकमेकांचे भाऊबंद आहेत. ते उदरनिर्वाहासाठी सोलापुरात आले आहेत. त्यांचा प्लास्टिक गोळा करून विक्रीचा व्यवसाय आहे. दरम्यान कल्याणी याचे संशयित कामाची याच्या पत्नीशी अनैतिक संबंध होते. याबाबत समजावून सांगूनही कल्याणी हा ऐकत नसल्याने त्यांच्यात भांडणे होत. तिघेही हल्लेखोर त्याच्यावर चिडून होते. अखेर तिघांनी कल्याणीचा काटा काढायचा ठरविला. त्यानुसार काल रात्री 11 वाजण्याच्या सुमारास कल्याणी हा कलावतीनगर येथे थांबला होता. त्यावेळी महेश, कामाची व शिवा हे तेथे कोयते घेऊन धावले. त्या तिघांनी अचानक कल्याणी याच्यावर कोयत्याने सपासप वार केले. या हल्ल्यात कल्याणी रक्तबंबाळ होऊन खाली कोसळला.

भरवस्तीत अचानक घडलेल्या या प्रकाराने भागातील नागरिकांची एकच धावपळ उडाली. कल्याणीला रक्ताच्या थारोळ्यात टाकून हल्लेखोर तेथून पसार झाले. त्यानंतर तेथील नागरिकांनी हा प्रकार एमआयडीसी पोलिसांनी सांगितला.

या हल्ल्याची माहिती पोलिस निरीक्षक विकास देशमुख यांच्यासह पोलिसांनी घटनास्थळी तातडीने धाव घेतली. नागरिकांच्या मदतीने पोलिसांनी जखमी कल्याणी याला उपचारासाठी शासकीय रुग्णालयात दाखल केले. परंतु उपचार सुरू असताना सोमवारी (दि. 17) सकाळी 11 वाजण्याच्या सुमारास कल्याणीचा मृत्यू झाला.

याप्रकरणी आरोपींविरुद्ध एमआयडी पोलिसांनी खुनाचा गुन्हा दाखल केला. हल्लेखोरांच्या शोधार्थ पोलिसांनी महाराष्ट्र व कर्नाटकात पथके रवाना केली आहेत. अधिक तपास फौजदार रमेश वळसंगे करीत आहेत.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news