पालकमंत्री बदलायला बाजारातील भाजीपाला आहे का? : ना. भरणे
सोलापूर : पुढारी वृत्तसेवा : पालकमंत्री बदलणे म्हणजे काय तो बाजारातील भाजीपाला आहे का, असा उलट सवाल करीत पालकमंत्री दत्तात्रय भरणे यांनी पालकमंत्री बदलाचे वृत्त खोटे असल्याचे स्पष्ट केले. पालकमंत्री म्हणून सोलापूरकरांची काळजी घेणे ही माझी जबाबदारी आहे, असेही ते म्हणाले. सोलापूरकरांना चार -चार दिवस पिण्याचे पाणी मिळत नाही, याचे मला दु:खही असल्याचे त्यांनी यावेळी स्पष्ट केले.
भरणे यांनी शनिवारी सकाळी जिल्हा नियोजन समितीच्या सभागृहात शासकीय योजनांचा आढावा घेतला. त्यानंतर त्यांनी पार्क चौकात पत्रकारांशी संवाद साधला. ते म्हणाले, पालकमंत्री बदलणे इतकं सोप नसतं. सोलापूरला मला विकासाचे मॉडेल बनवायचे आहे. माझ्या काळातच सोलापूरकरांचा पाण्याचा प्रश्न मिटेल. यासाठी युध्दपातळीवर दुहेरी पाईपलाईनची काम प्रगतीपथावर सुरू करण्यात आले आहे. येत्या 15 महिन्यात हे काम पुर्ण होणे अपेक्षित आहे.
भरणे म्हणाले, पालकमंत्री या नात्याने सोलापुरातील नागरिकांची काळजी घेणे ही माझी जबाबदारी आहे. सोलापुरातील रहदारीचा प्रश्न सोडविण्यासाठी बाह्यवळण रस्ता मंजूर करण्यात आला आहे. त्याचेही काम सुरू होईल. सोलापूरचे प्रश्न सोडविण्यासाठी मुख्यमंत्री उध्दव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे पाठपुरावा करीत आहेे.
पालकमंत्री बदलणे इतकं सोप नसतं. सोलापूरला मला विकासाचे मॉडेल बनवायचे आहे. माझ्या काळातच सोलापूरकरांचा पाण्याचा प्रश्न मिटेल. यासाठी युध्दपातळीवर दुहेरी पाईपलाईनची काम प्रगतीपथावर सुरू करण्यात आले आहे. येत्या 15 महिन्यात हे काम पुर्ण होणे अपेक्षित आहे. भरणे म्हणाले, पालकमंत्री या नात्याने सोलापुरातील नागरिकांची काळजी घेणे ही माझी जबाबदारी आहे. सोलापुरातील रहदारीचा प्रश्न सोडविण्यासाठी बाह्यवळण रस्ता मंजूर करण्यात आला आहे. त्याचेही काम सुरू होईल. सोलापूरचे प्रश्न सोडविण्यासाठी मुख्यमंत्री उध्दव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे पाठपुरावा करीत आहेे.
आ. प्रणिती शिंदे खूप हुशार; त्यांचा गैरसमज झाला
भरणे म्हणाले, आमदार प्रणिती शिंदे या अभ्यासू व हुशार लोकप्रतिनिधी आहेत. त्यांचाही उजनी पाणीप्रश्नी इतरांप्रमाणे काहीतरी गैरसमज झाला आहे. त्यांनी अधिकार्यांकडून माहिती घेतली, तर त्यांचा गैरसमज दूर होईल. लाकडी – निंबोडी योजना जुनीच आहे. सोलापूर जिल्ह्यातील बार्शी व मंगळवेढा तालुक्यातील जुन्या योजनांसाठीही निधी देण्यात येणार आहे.