पंढरपूर : इस्कॉन मंदिर माध्यमातून सामाजिक बांधिलकी जपण्याचे कार्य

इस्कॉन मंदिर
इस्कॉन मंदिर
Published on
Updated on

पंढरपूर;  पुढारी वृत्‍तसेवा :  इस्कॉनच्या माध्यमातून संपूर्ण विश्‍वात भगवद‍्गीतेचा आणि धार्मिक मूल्यांचा प्रसार करण्याचे काम सुरू आहे. मुंबई, ठाण्यासह महाराष्ट्रातील इस्कॉन मंदिराच्या माध्यमातून सामाजिक कार्यासोबतच सामाजिक बांधिलकी जपण्याचे कार्य केले जाते, असे प्रतिपादन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केले.

पंढरपूर देवस्थान मंदिर परिसरातील भूवैकुंठ प्रकल्प आणि श्री श्री राधा पंढरीनाथ मंदिराच्या भूमिपूजनप्रसंगी ते बोलत होते. यावेळी खासदार डॉ. श्रीकांत शिंदे, जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर, उपमहानिरीक्षक सुधीर हिरेमठ, पोलिस अधीक्षक तेजस्वी सातपुते, लोकनाथ स्वामी महाराज, श्रीकृष्ण चैतन्य स्वामी, सुंदर चैतन्य स्वामी, प्रल्हाद दास, भक्‍तिप्रेम स्वामी, कृष्णकांत दास आदी उपस्थित होते.

मुख्यमंत्री शिंदे म्हणाले, विश्‍वबंधुत्व, ऐक्य, एकता, सहिष्णुता, शांती निर्माण करण्यासाठी भूवैकुंठ माध्यम ठरेल. इस्कॉनच्या माध्यमातून चालविल्या जाणार्‍या अन्नछत्र व्यवस्थेचा भाविक मोठ्या प्रमाणात लाभ घेतात. 15 एकर जागेत भव्य-दिव्य मंदिराची उभारणी करण्यात येणार आहे. यामध्ये गुरुकुल शिक्षणपद्धती, बालसंस्कार वर्ग, अन्नछत्र, गोशाळा संवर्धन, संशोधन, भक्तनिवास असे विविध उपक्रम होणार आहेत. मंदिर परिसर विकासासाठी राज्य शासन आवश्यक सहकार्य करेल, असे त्यांनी सांगितले.

मुख्यमंत्री म्हणून राज्याच्या जनतेचा सेवा करण्याची संधी मिळाली असून सेवक म्हणून काम करणार आहे. राज्याला सुजलाम् सुफलाम् करून विकासाकडे नेण्यासाठी प्रयत्नशील राहू, अशी ग्वाही त्यांनी यावेळी दिली. मुख्यमंत्री शिंदे यांनी मंदिर परिसरातील प्रभूपाद घाटाची पाहणी केली.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news