अबब… शहाळ्याच्या आकाराचा तब्बल पावणेतीन किलोचा एक आंबा

अबब… शहाळ्याच्या आकाराचा तब्बल पावणेतीन किलोचा एक आंबा

सोलापूर; पुढारी वृत्तसेवा :  साधारणतः हापूस, केशर आंब्याचे शंभर, दीडशे ग्रॅमचे आंबे आपण आजवर पाहिले असतीलच. आता शहाळ्याच्या आकाराचा तोही तब्बल पावणेतीन किलोचा आंबा सोलापूरच्या आंबा महोत्सवात पाहायला मिळणार आहे. विशेष म्हणजे, यातील कोय ही सर्वसाधारण आंब्याइतकीच छोटी असेल.

सेंद्रियच्या पुढच्या पद्धतीचा म्हणजे होमिओपॅथी कृषी औषधांचा वापर करत माढा तालुक्यातील अरण येथील दत्तात्रय घाडगे यांनी त्यांच्या शेतामध्ये अशा आंब्याचे उत्पादन घेतले आहे. या आंब्याची चव चाखण्यासाठी 13 मे ते 21 मेपर्यंत जुळे सोलापूर येथील 'आयएमएस'जवळ आंबा महोत्सवाचे आयोजन करण्यात आल्याची माहिती घाडगे यांनी दिली. दत्तात्रय घाडगे (रा. अरण, ता. माढा), अमरजित ढाणे (रा. गादेगाव, ता. पंढरपूर) आणि सिद्धेश्वर जोकारे (रा. कंदलगाव, ता. दक्षिण सोलापूर) यांनी आपल्या शेतीमध्ये सेंद्रिय खतांसोबत होमिओपॅथी कृषी औषधांचा वापर आंबा पिकावर केला. निर्यातक्षम, पूर्णपणे रेसिड्यु फ्री आंब्याचे उत्पन्न घेतले. पत्रकार परिषदेस उदय धुमाळ व अमर राणे उपस्थित होते.

शेतकरी नैराश्येच्या गर्तेत अडकत चाललाय. कारण, शेतीचा खर्च त्यास परवडत नाही. उत्पादनास मार्केटमध्ये चांगला दर नाही. माझ्यासारखे नवे प्रयोग त्याने केले, तर शेतकरी नक्कीच यशस्वी होईल.
– दत्तात्रय घाडगे, बीग केशर आंबा उत्पादक

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news