

सोलापूर : पत्नीसोबत जबरदस्तीने शारीरिक संबंध बनविले. इतकेच नाही तर त्याचे व्हिडीओ काढले. ते व्हायरल करण्याची धमकी देत माहेरहून पाच लाख रुपये मागितल्याची संतापजनक घटना शहरातील भवानी पेठ परिसरात घडली. याबाबत पत्नीने ऋषिकेश बेळमकर याच्या विरोधात जोडभावी पेठ पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
ऋषिकेश बेळमकरचा विवाह दीड वर्षापूर्वी झाला. लग्नानंतर काही दिवसांतच पत्नीला सासरच्यांकडून मानसिक आणि शारीरिक त्रास देण्यास सुरुवात झाली. पती ऋषिकेश याने पत्नीच्या मनाविरुद्ध शारीरिक संबंध ठेवले. अश्लील व्हिडीओ देखील काढले. माहेरहून पाच लाख रुपये आण नाहीतर हे अश्लील व्हिडीओ व्हायरल करण्याची धमकी दिली.
दुसरीकडे सासू सासर्यांनी देखील लग्नात मानपान केले नाही, लग्नाचा अर्धा खर्च म्हणून पाच लाख रुपये आण नाहीतर घटस्फोट घे, असे म्हणत शारीरिक, मानसिक आणि आर्थिक छळ केला.
पत्नीच्या फिर्यादीवरून पती ऋषिकेश, सासरे दत्तात्रय, सासू मंजुळा आणि वंदना यांच्याविरोधात जोडभावी पेठ पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला. अधिक तपास पोलिस हवालदार वाडीकर करीत आहेत. दरम्यान, या घटनेने परिसरात खळबळ उडाली असून पोलिसांनीही तपासाची चक्रे गतीमान केली आहेत.