Ujjani canal discharge stop| उजनीच्या कालव्यातून आज विसर्ग बंद होणार

धरणातील साठा ८२.६८ टक्क्यांवर, तीन दिवसांत जलसाठ्यात १.३४ टीएमसीची घट
उजनी
उजनी
Published on: 
Updated on: 

सोलापूर : उजनी धरणातील पाणीसाठ्यात घट होत असल्याच्या पार्श्वभूमीवर कालव्यांमधून सोडण्यात येणाऱ्या पाण्याचा विसर्ग कमी करण्यात आला आहे. दरम्यान, आज, सोमवार (दि. १२ ऑक्टोबर) पासून कॅनॉलमधून विसर्ग पूर्ण कमी केला जाणार आहे, अशी माहिती जिल्हाधिकारी एस. कार्तिकेयन यांनी दिली.

८ ऑक्टोबर रोजी मुख्य कालव्यातून २ हजार ३५० क्युसेक पाण्याचा विसर्ग सुरू होता. तो ११ ऑक्टोबर रोजी कमी करून १ हजार ५०० क्युसेक करण्यात आला आहे. तसेच बोगद्यातून सोडण्यात येणारा विसर्गही ६०० वरून ४०० क्युसेक करण्यात आला आहे. उजनी धरणाच्या दैनंदिन पाणीपातळीच्या आकडेवारीनुसार, ८ ऑक्टोबर रोजी धरणात ४५.६३ टीएमसी उपयुक्त पाणीसाठा होता. त्यावेळी धरणाची पाणीपातळी ४९६.१४० मीटर आणि उपयुक्त साठ्याची टक्केवारी ८५.१७होती.

११ ऑक्टोबर रोजी हा उपयुक्त पाणीसाठा ४४.२९ टीएमसीवर आला असून, पाणीपातळी ४९६.०२० मीटर झाली आहे. उपयुक्त साठ्याची टक्केवारी ८२.६८ इतकी नोंदविण्यात आली आहे.

अवघ्या तीन दिवसांत धरणातील उपयुक्त पाणीसाठ्यात १.३४ टीएमसीची घट झाली आहे. टक्केवारीत २.४९ टक्क्यांची घट झाली आहे. या काळात धरणातील एकूण साठा १०९.२८ टीएमसीवरून १०७.९५ टीएमसीवर आला आहे.

धरणाच्या सांडव्यावरून, वीजगृहातून आणि नदीव्दारांतून पाण्याचा विसर्ग शून्य असल्याची नोंद आहे. मात्र, कालवा, बोगदा आणि उपसा सिंचन योजनांमधून पाणीपुरवठा सुरू आहे. तो आज पूर्ण बंद होणार आहे. पाण्याचा वापर सुरू असताना नव्याने पाण्याची आवक नसल्याने धरणातील साठ्यात घट होत आहे. त्यामुळे उपलब्ध पाण्याचे नियोजन महत्त्वाचे ठरणार आहे.

उजनी
Solapur Fake Liquor Seized : बनावट मद्याच्या कंटेनरसह ८४ लाखांचा मुद्देमाल जप्त

गतवर्षी याच कालावधीत उजनी धरण १०० टक्के भरलेले होते. त्यावेळी उपयुक्त पाणीसाठा ५३.५७ टीएमसी होता. यंदा मात्र ११ ऑक्टोबर रोजी उपयुक्त साठा ४४.२९ टीएमसी आहे. गतवर्षीच्या तुलनेत यंदाचा उपयुक्त पाणीसाठा ९.२८ टीएमसीने कमी आहे.

उजनी
Solapur Market : बाजारात केळी, झेंडूला मोठी मागणी

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news