Solapur Market : बाजारात केळी, झेंडूला मोठी मागणी

आवक घटल्‍याने झेंडूसह इतर फुलांचे दर भडकले!
Solapur Market : बाजारात केळी, झेंडूला मोठी मागणी
Published on: 
Updated on: 

​सोलापूर : कुलस्वामिनीच्या भक्तीचा आणि शक्तीचा जागर असणाऱ्या नवरात्रोत्सवाला आज रविवारपासून (दि. ११) सुरुवात होत आहे. या पार्श्वभूमीवर सोलापूरच्या बाजारपेठेत केळी, झेंडूसह इतर फुलांची मागणी मोठ्या प्रमाणात वाढली आहे. बाजारातील फुलांची आवक घटल्‍याने दरात वाढ झाली आहे.

देवीच्या पूजेसाठी, घटस्थापनेसाठी आणि उपवासाच्या पदार्थांसाठी नागरिकांकडून खरेदीसाठी चांगला प्रतिसाद मिळत आहे. बाजारात झेंडूच्या फुलांसह केळीला मोठी मागणी वाढली आहे. मात्र, यंदा पावसाने मारलेली दडी आणि दुष्काळजन्य परिस्थितीमुळे फुलांची आवक घटल्याने झेंडूसह इतर फुलांच्या दरात वाढ झाल्‍याचे व्‍यापाऱ्यांकडून सांगण्यात येत आहे.

चार टन केळीची आवक

देवीचा नैवेद्य व उपवासासाठी केळीला विशेष मागणी असल्याने बाजार समितीत शुक्रवारी चार टन केळीची आवक झाली आहे. केळीसोबतच सफरचंद, डाळिंब व इतर फळांची आवक वाढली असून, भावात वाढ झाल्‍याचे व्‍यापाऱ्यांनी सांगितले.

फुलांचे भाव (किलोमध्ये)

l झेंडू - ६० ते ८० रु. l गुलाब - १५० रु. l शेवंती - १२० रु.

l काकडा - ४०० रु. l निशीगंधा - १५० रु.

राजगिरा, शेंगा लाडू, खजूर मागणीत वाढ

​नवरात्रात सलग नऊ दिवस उपवास करणाऱ्या भाविकांची संख्या मोठी असते. त्यामुळे ​भगर, शाबू, खजूर, राजगिरा लाडू, शेंगाचे लाडू, राजगिरा वडी, बटाटा वेफर्स यांची मागणी वाढल्‍याचे चित्र बाजारात दिसत आहे.

नवरात्रोत्सवात झेंडूसह इतर फुलांची मागणी मोठ्या प्रमाणात आहे. मात्र, दुष्काळामुळे फुलांची आवक कमी झाली आहे. तरीही नागरिकांकडून फुलांची मोठी खरेदी होत आहे.
- श्रीशैल घुली, फुल विक्रेते

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news