तुळजाभवानी मातेची महिषासूर मर्दिनी अलंकार महापूजा

होमकुंडावर आज अजाबलीचा धार्मिक विधी
Solapur News
महाराष्ट्राची कुलस्वामिनी श्री तुळजाभवानी मातेची शुक्रवारी (दि. 11) दुर्गाष्टमीदिवशी नवव्या माळेला महिषासुर मर्दिनी अलंकार महापूजा बांधण्यात आली.Pudhari Photo
Published on
Updated on

तूळजापूर : संजय कुलकर्णी

महाराष्ट्राची कुलस्वामिनी तथा शक्तिदेवता श्री तुळजाभवानी मातेची शुक्रवारी (दि. 11) दुर्गाष्टमीदिवशी नवव्या माळेला महिषासुर मर्दिनी अलंकार महापूजा बांधण्यात आली होती. नऊ दिवसांपासून येथे सुरू असलेल्या शारदीय नवरात्रौत्सवात मंदिर संस्थानकडून मातेच्या विविध रूपातील विशेष अवतार महापूजा, धार्मिक सोहळ्यांसह दररोज सायंकाळी मातेच्या छबिना मिरवणुकीचे आयोजन करण्यात आले. शुक्रवारी सकाळी सात वाजता श्री तुळजाभवानी मंदिरातील होम कुंडावर शतचंडी वैदिक होमास प्रारंभ झाला. या होमाचे यजमान म्हणून धाराशिवचे जिल्हाधिकारी तथा श्री तुळजाभवानी मंदिर संस्थांनचे अध्यक्ष सचिन ओंम्बासे व त्यांच्या पत्नी अस्मिता ओंम्बासे हे होते. या होमाचे पौरोहित्य नागेश अंबुलगे,

Solapur News
Tuljapur : तुळजाभवानी देवीची आठव्या माळेला भवानी तलवार अलंकार महापूजा

सुनीत (बंडू) पाठक, ऋषीकेश दादेगावकर, राजन प्रयाग, यांच्यासह असंख्य ब्रह्मवृंदांनी केले. या होमावर तब्बल सव्वा पाच तास विविध आहुती देण्याचा धार्मिक विधी पार पडला. या उभयतांच्या हस्ते दुपारी 12.15 वाजता होमास पूर्णाहुती देण्याचा कार्यक्रम पार पडला. यावेळी श्रीफळ, भोपळे, कव्हाळे अर्पण करून होमास पूर्णाहुती देण्यात आली. त्यानंतर उपस्थीत ब्रम्हवृंद व मंदिर संस्थांनकडून जिल्हाधिकार्‍यांचा यथोचित भर पेहराव आहेर देवून सत्कार करण्यात आला. यावेळीआई राजा उदो उदो च्या जयघोषात सामान्य भाविकांनीही होमास पूर्णाहुती दिली. शुक्रवारी सायंकाळी दुर्गाष्टमीनिमित्त मातेची सायंकाळची शोड्षोपचार पूजा पार पडल्यानंतर मंदीर परिसरात संबळाच्या कडकडाटात छबिना मिरवणूक झाली. प्रक्षाळ पूजा पार पडली.

Solapur News
तुळजाभवानी मंदिरात दुसऱ्या माळेस नेत्रदीपक फुलांची सजावट

नवरात्रौत्सवाची आज सांगता

शनिवारी (दि. 12) घटाला दहावी माळ घालून शारदीय नवरात्रौत्सवाची सांगता होणार आहे. देवीचे सीमोल्लंघन रविवारी (दि. 13) पहाटे पार पडून देवीच्या मुख्य मूर्तीची पाच दिवसाची श्रम निद्रा चालू होणार आहे. सार्वत्रिक सीमोल्लंघन शनिवारी सायंकाळी होईल.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news