मंगळवेढा कारागृहातील तीन कैद्यांना कोरोनाची लागण

मंगळवेढा कारागृहातील तीन कैद्यांना कोरोनाची लागण

मंगळवेढा, पुढारी वृत्तसेवा : मंगळवेढा कारागृहातील ५१ कैद्यापैकी ३ कैद्यांना कोरोनाची लागण झाली आहे. मंगळवेढा कारागृहातील दोन कैदी आजारी असल्याने त्यांना सोलापूर येथील शासकीय रूग्णालयात तपासणीला नेण्यात आले होते. यावेळी दोन पैकी एकजण कोरोना पॉझिटिव्ह आल्याचे तपासणीत आढळून आले आहेत. दरम्यान जेलर, कैदी, पोलीस कर्मचारी यांची आज शनिवारी (दि. २१ ऑगस्ट) कोरोना तपासणी करण्यात आली.

मंगळवेढा कारागृहातील उर्वरीत ५१ कैद्यांची तपासणी केल्यानंतर दोन कैदी पॉझिटिव्ह असल्याने येथील कोरोना पॉझिटिव्ह कैद्याची संख्या आता तीन झाली असल्याचे जेलरकडून सांगण्यात आले. येथील दोन कैद्यांना विलगीकरण कक्षात ठेवण्यात आले आहे. कैदी पॉझिटिव्ह आल्याने तेथे कार्यरत असणारे पोलीस कर्मचारी व कैदी भयभीत झाले होते.

ग्रामीण रूग्णालयाचे प्रयोगशाळा वैज्ञानिक विजयकुमार येळदरे यांच्यासह पथक कारागृहात शनिवारी दुपारी १२ वाजता तपासणीसाठी दाखल झाले. यावेळी जेलर सिताराम कोळी तसेच कैद्याना अन्नपुरवठा करणारे ठेकेदार, गार्डवर असलेले पोलीस कर्मचारी यांचीही तपासणी करण्यात आली. मात्र इतर सर्वांचा कोरोना अहवाल नेगेटिव्ह आला आहे.

हेही वाचा : 

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news