तहसीलदारांची फिल्मी स्टाईल कारवाई; पाठलाग करत पकडला अवैध वाळूचा ट्रक

तहीलदार शिल्पा ठोकडे यांनी जातेगाव येथे पाठलाग करून अवैध वाळू वाहतूक करणारा ट्रक पकडुन दंडात्मक कारवाई केली.
तहीलदार शिल्पा ठोकडे यांनी जातेगाव येथे पाठलाग करून अवैध वाळू वाहतूक करणारा ट्रक पकडुन दंडात्मक कारवाई केली.
Published on
Updated on

करमाळा, पुढारी वृत्तसेवा : मागील काही दिवसांपासून करमाळा तालुक्यात अवैध वाळू वाहतूक सुरु होती. काही दिवसांपुर्वीच सोलापूरच्या गुन्हे अन्वेषण विभागाने कुगाव, चिकलठाण, ढोकरी आदि ठिकाणी छापे मारून अवैध वाळू व्यवसाय करणाऱ्या माफियांना गजाआड केले.

दरम्यान करमाळा तहसीलदार शिल्पा ठोकडे यांनी निवडणुकीच्या व्यस्त कामातून बाहेर येत पुन्हा कारवाई करून वाळू माफियांना चाप बसवला आहे. करमाळा तालुक्यामध्ये ढोकरी, चिकलठाण, कुगाव, खडकी, आळजापुर, बिटरगाव, घारगाव ,करंजे ,आवाटी आदी भागात वाळू माफियांनी पुन्हा जोर धरला होता. अहमदनगर जिल्ह्यातील जवळा तसेच पुणे जिल्ह्यातील इंदापूर तालुक्यातील वाळू माफिया अवैध वाळू काढून मलिदा लाटण्याचा व्यवसाय जोरात चालू केला होता.

या घटनेबाबत जातेगाव येथे अवैध वाळूची तस्करी केली जात असल्याची माहिती तहसीलदार ठोकडे यांना मिळाली होती. रात्री दोन वाजण्याच्या सुमारास तहसीलदार शिल्पा ठोकडे यांनी एकट्याच जावून जातेगाव येथे अवैध वाळू घेऊन चाललेला विना क्रमांकाचा ट्रक चालकासह रंगेहात पकडला. तसेच ट्रकमधील साडेतीन ब्रास वाळू जप्त केली. या छाप्यादरम्यान 2 लाख 87 हजार 325 रूपयाचा दंड घोडके नावाच्या चालकाला ठोठावला.

हेही वाचा :

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news