

दीपक शेळके
सोलापूर : केंद्र शासनाच्या स्वच्छ भारत, हागणदारीमुक्त अभियानात सोलापूर महानगरपालिका अव्वल ठरली आहे. हागणदारीमुक्त अभियान (ओडीएफ प्लस प्लस) राबवत शहरातील उघड्यावर शौचास बसण्याची ठिकाणे पूर्णपणे बंद केली. नागरिकांना वैयक्तिक शौचालय योजनेचा लाभ देण्यात आले. शासनाच्या पथकाकडून स्वच्छ सर्वेक्षण तपासणीमध्ये सोलापूर महापालिकेस 3 स्टार मानांकन मिळाले.
स्वच्छ भारत अभियानांतर्गत महापालिकेच्या वतीने शहरातील रहिवासी, व्यापारी क्षेत्र, सार्वजनिक ठिकाणे, शैक्षणिक संस्था इत्यादी सर्व ठिकाणाची दैनंदिन स्वच्छता, झाडलोट, साफसफाई, तसेच सार्वजनिक शौचालयांची स्वच्छता इत्यादी कामकाज करण्यात येते. शहरातील नागरिकांना आरोग्यविषयक सुविधा उत्तमप्रकारे पुरविण्यासाठी महानगरपालिका प्रयत्नशील आहे. सन 2018 पासून महापालिकेच्यावतीने हागणदारीमुक्त अभियान राबवण्यात येत आहे.
केंद्र शासनाच्या स्वच्छ भारत, हागणदारीमुक्त अभियानात सोलापूर महानगरपालिका अव्वल ठरली आहे. हागणदारीमुक्त अभियान (ओडीएफ प्लस प्लस) राबवत शहरातील उघड्यावर शौचास बसण्याची ठिकाणे पूर्णपणे बंद केली. नागरिकांना वैयक्तिक शौचालय योजनेचा लाभ देण्यात आले. शासनाच्या पथकाकडून स्वच्छ सर्वेक्षण तपासणीमध्ये सोलापूर महापालिकेस 3 स्टार मानांकन मिळाले.
हागणदारीमुुक्त अभियानात महापालिकेस सलग पाच वेळा ओडीएफ प्लस प्लस मानांकन मिळाले आहे. त्यामुळे त्रिस्टार रँकिंग प्राप्त आहे. या रँकिंगमुळे केंद्र शासनाच्या 15 व्या वित्त आयोगाच्या निधीसाठी सोलापूर महानगर पालिका पात्र ठरली आहे.
शहरातील उघड्यावर शौचास बसण्याची ठिकाणे पूर्णपणे बंद करण्यासाठी नागरिकांसाठी वैयक्तिक शौचालय योजना राबवण्यात आली. ज्यांच्याकडे शौचालय नाही अशा 21 हजार 395 वैयक्तिक शौचालयाची उभारणी करण्यासाठी प्रति शौचालय 15 हजार याप्रमाणे 32 कोटींच्या आसपास निधी खर्च करण्यात आला आहे.