सोलापूर पोलिस अधीक्षकपदी कुलकर्णी

सरदेशपांडे यांची पुणे लाचलुचपत प्रतिबंध विभागात बदली
Superintendent of Police Atul Kulkarni was appointed
पोलिस अधीक्षक अतुल कुलकर्णी Pudhari File Photo
Published on
Updated on

सोलापूर : सोलापूर ग्रामीण पोलिस अधीक्षक शिरीष सरदेशपांडे यांची पुणे येथील लाचलुचपत प्रतिबंधक विभागात बदली झाली आहे. त्यांच्या जागी धाराशिव येथील पोलिस अधीक्षक अतुल कुलकर्णी यांची नियुक्ती झाली आहे.

राज्यातील ग्रामीण पोलिस अधिकार्‍यांच्या बदल्या मंगळवारी (दि. 13) झाल्या. त्याचे परिपत्रक सहसचिव व्यंकटेश भट यांनी काढले. सरदेशपांडे यांनी आपल्या कार्यकाळात चांगली यंत्रणा राबवून, टीमवर्कने काम केल्यामुळे विविध कामे लक्षात राहणारी अशीच आहेत. पंढरपूर येथील आषाढी वारीसाठी चोख नियोजन केले. त्यामुळे वारी अत्यंत यशस्वी, सुरळीतपणे पार पडली. वारीच्या काळात मराठा आरक्षणाचा मुद्दा चांगलाच चिघळला होता. यावेळी सरदेशपांडे यांनी मराठा बांधवांशी समन्वय साधून, चर्चा करून आंदोलन चिघळू दिले नाही.

Superintendent of Police Atul Kulkarni was appointed
कोल्हापूर : ८ पोलिस निरीक्षकांच्या जिल्ह्यातर्गंत बदल्या

सरदेशपांडे यांच्या काळात दोन वेळा पोलिस भरतीचे चोख नियोजन केले. विविध तालुक्यातील घरफोडी, मोटारसायकल चोरी, अवैध दारू विक्रीवर ही मोठया प्रमाणात कारवाई केली आहे. दोन वेळा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा सोलापूरचा दौरा झाला. यावेळी ही तगडा बंदोबस्त लावून कोणतीही अनुचित घडना घडू दिली नाही. नुकतीच लोकसभा निवडणुक पार पडली.

Superintendent of Police Atul Kulkarni was appointed
Nashik News | उपनिरीक्षक झाले सहायक पोलिस निरीक्षक

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news