

कोल्हापूर : कोल्हापूर पोलिस दलात सोमवारी रात्री फेरबदल करण्यात आले आले. निरीक्षक दर्जाच्या ८ अधिकाऱ्यांच्या जिल्ह्यातर्गंत बदल्या करण्यात आल्या आहेत. पोलिस अधीक्षक महेंद्र पंडीत यांनी आज (दि.१२) बदल्यांचे आदेश लागू केले. राजारामपुरीला सुशांत चव्हाण तर अनिल तनपुरे यांच्याकडे शहर वाहतूक शाखेची जबाबदारी सोपविण्यात आली आहे.
जिल्ह्यातर्गंत बदल्या झालेल्या अधिकाऱ्यांची नावे पुढीलप्रमाणे, कंसात नवीन नियुक्तीचे ठिकाण : सुशांत चव्हाण-नियंक्षण कक्ष (भुदरगड पोलिस ठाणे), सुशांत चव्हाण-नियंत्रण कक्ष (राजारामपुरी पोलिस ठाणे), प्रमोद शिंदे-नियंत्रण कक्ष (जिल्हा विशेष शाखा), अनिल तनपुरे-राजारामपुरी ( शहर वाहतूक नियंत्रण शाखा), महेश इंगळे -पन्हाळा पोलिस ठाणे ( आर्थिक गुन्हे शाखा), राजू ताशिलदार -शिवाजीनगर ( पासपोर्ट शाखा),नंदकुमार मोरे -शिवाजीनगर ( सायबर पोलिस ठाणे), सचिन पाटील-भुदरगड (शिवाजीनगर पोलिस ठाणे ) बदलीचे आदेश प्राप्त होताच संबंधितांनी तत्काळ पदभार स्विकारावा, असे आदेशात म्हटले आहे.