Graduate Constituency Election| पदवीधर, शिक्षक उमेदवारांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहा : पालकमंत्री जयकुमार गोरे

भाजपचे उमेदवार शिक्षण क्षेत्राची जाण असणारे; ७५ टक्के मतदानासाठी प्रयत्न करण्याचे आवाहन
Graduate Constituency Election
वेणेगाव (ता. माढा) येथे पुणे पदवीधर मतदारसंघाच्या उमेदवार डॉ. स्मिता जाधव आणि शिक्षक मतदारसंघाचे उमेदवार कौस्तुभ गावडे यांच्या प्रचारार्थ प्रचारसभा Pudhari
Published on: 
Updated on: 

Graduate Constituency Election

टेंभुर्णी : दिल्लीत बसून निवडणुका लढवायच्या आणि ईव्हीएमला बदनाम करायचे, अशी भूमिका काही जण घेत आहेत. मात्र, भाजप प्रत्येक निवडणूक प्रचंड ताकदीने लढतो. पदवीधर आणि शिक्षकांचे प्रश्न मांडण्याची क्षमता असलेले, शिक्षण क्षेत्राची जाण असणारे उच्चशिक्षित उमेदवार भाजपने दिले आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली अडचणी सोडविण्यासाठी तत्परतेने प्रयत्न केले जातात. त्यामुळे भाजपच्या उमेदवारांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहणे हे आपले कर्तव्य आहे, असे प्रतिपादन पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी केले.

वेणेगाव (ता. माढा) येथील कार्यालयात पुणे पदवीधर मतदारसंघाच्या उमेदवार डॉ. स्मिता जाधव आणि शिक्षक मतदारसंघाचे उमेदवार कौस्तुभ गावडे यांच्या प्रचारार्थ पालकमंत्री जयकुमार गोरे यांच्या नेतृत्वाखाली प्रचारसभेचे आयोजन करण्यात आले होते. या वेळी ते बोलत होते.

Graduate Constituency Election
Pune Graduate Constituency Election: पुणे पदवीधर निवडणुकीत डॉ. स्मिता जाधव यांच्या विजयासाठी महायुतीचे सांघिक प्रयत्न; दत्तात्रय भरणे यांची ग्वाही

गोरे म्हणाले की, दोन्ही उमेदवारांचा शिक्षण क्षेत्राशी जवळचा संबंध आहे. ४४२ संस्था आणि सुमारे साडेसहा हजार शिक्षक या क्षेत्रात कार्यरत आहेत. अनेक कुटुंबांचे जीवन उभे करण्यात या क्षेत्राचे मोठे योगदान आहे. भाजपचे उमेदवार थेट मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यापर्यंत पोहोचून प्रश्न मांडू शकतात. शाळा आणि शिक्षण क्षेत्राशी संबंधित प्रश्न सोडविण्यासाठी शासन कटिबद्ध आहे. हे आपले सरकार आहे, ही भावना सर्वांनी लक्षात घेतली पाहिजे.

प्रत्येक मतदारापर्यंत पोहोचून प्रचाराला गती द्या. रणजितसिंह शिंदे यांच्या पाठीशीही भक्कमपणे उभे राहा, असे आवाहन त्यांनी केले. सोलापूर महापालिका आणि जिल्हा परिषद निवडणुकांचा संदर्भ देत भाजपने निवडणुका ताकदीने लढल्याचे त्यांनी नमूद केले. निकालानंतर तालुकानिहाय मतदानाचा आढावा घेतला जाणार असल्याचे सांगत, ७५ टक्के मतदान मिळविण्याच्या उद्दिष्टाने काम करण्याचे आवाहनही त्यांनी कार्यकर्त्यांना केले.

Graduate Constituency Election
Pune Graduate Teacher Constituency Election: पुणे पदवीधर, शिक्षक मतदारसंघात महायुतीचा विजय निश्चित; मुरलीधर मोहोळ यांचा विश्वास

सोलापूर जिल्ह्याला पालकमंत्री कधी मिळणार, असा प्रश्न वारंवार उपस्थित केला जातो. मात्र, जिल्ह्याने आपल्याला स्वीकारले असून येथे काम करताना समाधान वाटत असल्याचे गोरे म्हणाले. बैलगाडी व्यवस्थित चालण्यासाठी दोन्ही बैलांनी बरोबरीने चालणे आवश्यक असते, असे उदाहरण देत त्यांनी दोन्ही उमेदवारांना योग्य पद्धतीने मतदान करण्याचे आवाहन केले.

रणजितसिंह शिंदे यांनीही या वेळी मार्गदर्शन केले. शाळा आणि शिक्षकांनी सहकार्याची भूमिका घ्यावी. मतदानाला शेवटचे दोन दिवस शिल्लक असल्याने कार्यकर्त्यांनी रात्रंदिवस मेहनत करून प्रचार करावा. आपले प्रश्न कोण सोडवू शकते, हे मतदारांनीही समजून घ्यावे, असे ते म्हणाले.

या वेळी पक्ष निरीक्षक आमदार राघवेंद्र पाटील, शिवाजी कांबळे, सविता जगताप आणि कल्याण अनपट यांची भाषणे झाली. नितीन झाडबुके यांनी प्रास्ताविक केले.

सभेला संजय पाटील-भीमानगरकर, सभापती पंडित देशमुख, पृथ्वीराज सावंत, भाजप जिल्हाध्यक्ष गणेश चिवटे, योगेश बोबडे, तुकाराम ढवळे, जयसिंग ढवळे यांच्यासह पदाधिकारी, कार्यकर्ते आणि मतदार मोठ्या संख्येने उपस्थित होते.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news