

Crime News
पंढरपूर: मुलाला सोडून थेट नातवाच्या नावावर शेती केल्याने संतापलेल्या मुलाने वडिलांच्या डोक्यात दगड घालून खून केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. ही घटना मंगळवेढा तालुक्यातील डोनज गावात शुक्रवारी मध्यरात्री घडली.
महादेव पुजारी (वय ७०) असे खून झालेल्या वडिलांचे नाव आहे. याप्रकरणी मुलगा काशीनाथ पुजारी याला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. डोक्यात दगड घालून आपल्या बापाचा खून केल्याची कबूली त्याने दिली आहे.