Maharashtra MLC Election : डॉ. स्मिता जाधव, कौस्तुभ गावडे यांच्या विजयासाठी आ. देशमुखांचा प्रचार दौरा

प्रचार मोहिमेला मतदारांकडून सकारात्मक प्रतिसाद
Maharashtra MLC Election : डॉ. स्मिता जाधव, कौस्तुभ गावडे यांच्या विजयासाठी आ. देशमुखांचा प्रचार दौरा
Published on: 
Updated on: 

सोलापूर : पुणे शिक्षक व पदवीधर मतदारसंघातील भाजपचे अधिकृत उमेदवार डॉ. स्मिता योगेश जाधव व कौस्तुभ मुरलीधर गावडे यांच्या प्रचारार्थ शहर उत्तरचे आ. विजयकुमार देशमुख यांनी शिक्षक व पदवीधर मतदारांच्या घरोघरी जाऊन प्रत्यक्ष भेटीगाठी घेतल्या. यावेळी भाजपच्या दोन्ही उमेदवारांना विजयी करण्याचे आवाहन करत मतदारांशी संवाद साधला. या प्रचार मोहिमेला मतदारांकडून सकारात्मक प्रतिसाद मिळत आहे.

अनेकांनी चहापान व अल्पोपहाराचा आग्रह धरला. आमदार देशमुख यांनीही शक्य त्याठिकाणी मतदारांच्या आग्रहाचा मान राखत चहापान स्वीकारले. या अनौपचारिक भेटींमध्ये शिक्षक व पदवीधर मतदारांशी मनमोकळ्या गप्पा रंगल्या. निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर उमेदवारांच्या विजयासाठी सकारात्मक चर्चा झाली.

या भेटीगाठींप्रसंगी राजशेखर हिरेहब्बू, नगरसेवक अमर पुदाले, नगरसेवक प्रवीण दर्गोपाटील, बिपीन धुम्मा, प्रसाद कुलकर्णी, बसवराज अंकुशे, योगीराज भोगडे, ओंकार भोगडे, राजेंद्र नाशिककर, शशांक खुणे, सिद्धाराम भेरुपाटील, चंद्रकांत वाकडे, तम्मा कल्याणशेट्टी, अरविंद झगडे, अभिषेक मेंगाणे व प्रभागातील पदाधिकारी व सहकारी उपस्थित होते.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news