Solapur Crime | वैराग शहरात युवकाचा दगडाने ठेचून खून; तिघा संशयितांना अटक

पोलिसांनी या प्रकरणी गुन्हा दाखल करून तिघा संशयितांना ताब्यात घेतले आहे
Vairag City Youth Stoned to Death
दिनेश कापसे Pudhari
Published on
Updated on

Vairag City Youth Stoned to Death

वैराग : वैराग शहरातील दत्तनगर परिसरात शनिवारी (दि.२) पहाटे एका युवकाचा दगडाने ठेचून खून करण्यात आल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. या प्रकारामुळे परिसरात भीती आणि खळबळ निर्माण झाली आहे. पोलिसांनी या प्रकरणी गुन्हा दाखल करून तिघा संशयितांना ताब्यात घेतले आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, दिनेश कापसे (वय ३०, रा. वैराग) हा युवक शनिवारी पहाटे दत्तनगर भागात मृतावस्थेत आढळून आला. अज्ञात व्यक्तींनी त्याच्यावर दगडाने वार करत निर्घृणपणे खून केल्याचे प्राथमिक तपासात समोर आले आहे. घटनेची माहिती मिळताच वैराग पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक कुंदन गावडे यांनी तातडीने आपल्या पथकासह घटनास्थळी धाव घेतली आणि पंचनामा करून परिस्थितीचा आढावा घेतला.

Vairag City Youth Stoned to Death
Solapur Crime : शिवीगाळ केल्याने तरुणाचा डोक्यात दगड घालून खून

तपासादरम्यान पोलिसांनी घटनास्थळाच्या परिसरातील सीसीटीव्ही फुटेजची तपासणी केली. या आधारे संशयितांची ओळख पटवून तिघांना ताब्यात घेण्यात आले आहे. त्यांची कसून चौकशी सुरू असून, खूनामागील नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही.

दरम्यान, या घटनेमुळे दत्तनगर परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले असून, वैराग पोलिसांकडून पुढील तपास सुरू आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news