Solapur Crime : शिवीगाळ केल्याने तरुणाचा डोक्यात दगड घालून खून

कलावतीनगर परिसरातील घटना; संशयिताला अटक
Solapur Crime News
शिवीगाळ केल्याने तरुणाचा डोक्यात दगड घालून खून
Published on
Updated on

सोलापूर : शिवीगाळ केल्याच्या क्षुल्लक कारणावरून 21 वर्षीय तरुणाच्या डोक्यात दगड घालून खून केल्याची धक्कादायक घटना शनिवारी (दि. 25) रात्री अक्कलकोट रोड एमआयडीसी परिसरातील कलावतीनगर येथे घडली.

महेश गुरूसिद्धप्पा सावळतोटे (वय 21, रा. सिद्धरामेश्वरनगर, एमआयडीसी) असे खून झालेल्या युवकाचे नाव आहे. याप्रकरणी आरोपी सोमनाथ जवळकोटे (वय 31, रा. शिवलिंग मंगल कार्यालयजवळ, कलावतीनगर) याच्यावर गुन्हा दाखल करून पोलिसांनी आरोपीला ताब्यात घेतले आहे.

मृत महेश हा वीटभट्टीवर कामगार होता. त्यास दारूचे व्यसन होते. शनिवारी रात्री तो दारूच्या नशेत तेलगू शाळेसमोर झोपला होता. रात्री साडेबाराच्या वेळी आरोपी सोमनाथचा त्याला पाय लागला. यावरून दोघांत वाद झाल्यावर महेशने शिवीगाळ केली. याचा राग अनावर झाल्याने सोमनाथने दगड फेकून मारला आणि नंतर मोठ्या दगडाने महेशच्या डोक्यात प्रहार केला. यामध्ये महेश रक्ताच्या थारोळ्यात कोसळला. रविवारी सकाळी ही घटना उघडकीस आली. पोलिसांनी महेशला शासकीय रुग्णालयात दाखल केले, मात्र उपचारापूर्वीच त्याचा मृत्यू झाला होता. याबाबत मृताचा भाऊ नागेश सावळतोटे याने एमआयडीसी पोलिसांत तक्रार दिली.

लग्न घरावर शोककळा

मयत महेशच्या चुलत भावाचे रविवारी लग्न होते. शनिवारी हळदीच्या कार्यक्रमात महेश सहभागी होता. रात्री दारूच्या अंमलाखाली तो शाळेसमोरील मोकळ्या मैदानात झोपला असता खुनाची घटना घडली. मात्र लग्नसोहळ्याच्या आनंदावर विरजण पडू नये म्हणून मामा आणि मोठ्या भावाने खुनाबाबतची माहिती कुटुंबापासून काही वेळ लपवून ठेवली आणि लग्न पार पडल्यानंतर दुपारी ही माहिती दिली. यानंतर संपूर्ण लग्नघरावर शोककळा पसरली.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news