Solapur Politics : ठाकरेंच्या शिवसेनेत सकाळी कुस्ती अन्‌‍ दुपारी दोस्ती

दोन पदाधिकाऱ्यांनी घेतल्या इच्छुकांच्या वेगवेगळ्या मुलाखती
Solapur Politics
सोलापूर ः ठाकरेंच्या शिवसेनेत गेल्या अनेक दिवसांपासून वादंग सुरू आहे. मात्र मंगळवारी मातोश्रीकडून निरोप घेऊन आलेल्या निरीक्षकासमोर सर्व शत्रू एकमेकांचे मित्र होत एकत्र आल्याचे छायाचित्र.
Published on
Updated on

सोलापूर : उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेतील अंतर्गत वाद संपण्याची चिन्हे नाहीत. गेल्या तीन दिवसांपासून सुरू असलेला हा संघर्ष अधिकच तीव्र होताना दिसत आहे. मंगळवारी पक्षांतर्गत वाद पुन्हा एकदा उघडपणे चव्हाट्यावर आला. पक्षाच्या दोन नेत्यांनी दोन वेगवेगळ्या ठिकाणी इच्छुकांच्या स्वतंत्र मुलाखती घेतल्या. दोन्ही ठिकाणी मिळून 224 जणांच्या मुलाखती पार पडल्या. दरम्यान, मातोश्रीवरून पक्षश्रेष्ठींचा निरोप घेऊन आलेल्या निरीक्षकासमोर मात्र एकमेकांचे शत्रू असलेले नेते एकत्र आले. यामुळे पक्षातील नेत्यांत सकाळी कुस्ती आणि दुपारी दोस्ती झाल्याचे चित्र दिसते.

Solapur Politics
Solapur News : माजी चार नगरसेवकांना मिळाली परत एकदा संधी

पक्षातील वाद निरीक्षकांनाही अनुभवास आला. कारण, पक्षातील दोन्ही गटांनी घेतलेल्या इच्छुकांच्या मुलाखतींचा तपशील, कागदपत्रे पक्षनिरीक्षकांकडे पोहोच केली. यामुळे पक्षात सर्वकाही अलबेल नाही, याचा अनुभव पक्ष निरीक्षकांनाही आला. या प्रकारामुळे सर्वसामान्य शिवसैनिक आणि इच्छुक उमेदवारांची मात्र चांगलीच गोची झाली आहे.

दोन्ही गटाकडून 224 इच्छुकांच्या मुलाखती

पक्षाचे जिल्हाप्रमुख अजय दासरी गटाच्या अशोक चौकातील कार्यालयात 202 इच्छुकांचे अर्ज दाखल झाले. त्यापैकी मंगळवारी 158 उमेदवारांच्या मुलाखती घेण्यात आल्या. उर्वरित इच्छुकांच्या मुलाखती आज (बुधवारी) घेतल्या जाणार आहेत. तर बाजूला म्हणजे निवडणूक समन्वय समितीचे प्रमुख पुरूषोत्तम बरडे आणि अन्य नेत्यांनी 66 इच्छुकांच्या मुलाखती घेतल्या. त्यामुळे पक्षाकडे एकूण 224 इच्छुक उमेदवारांच्या मुलाखती पार पडल्या.

दोन्ही गटाचे नेते आले एकत्र

सोलापूरातील पक्षांतर्गत वाद ङ्गमातोश्रीफवर पोहोचला. यामुळे पक्षाचे नेते विश्वनाथ नेरूळकर यांनी जिल्हाप्र्रमुख धनजंय डिकोळे, दीपक गायकवाड आणि प्रकाश वानकर यांना दोन गटामध्ये समन्वय साधण्यासाठी पाठवले. त्यांनी दोन्ही गटांच्या नेत्यांना एकत्र करत विविध विषयांवर चर्चा केली. सकाळच्या टप्प्यात एकमेकांवर आरोप-प्रत्यारोप करणारे नेते दुपारच्या टप्प्यात मात्र एकमेकांचे मित्र बनल्याचे दिसून आले. असे असले तरी पक्षांतर्गत वादवर कायमचा तोडगा काढण्यासाठी ङ्गमातोश्रीफवरून निरीक्षकांना पाठविण्यात येणार असल्याची चर्चा आहे.

Solapur Politics
Solapur municipal election: सोलापुरात Solapur News: भाजप विरुद्ध भाजप द्वंद्व रंगण्याची चिन्हे

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news