तोरंबा येथील मृत शेतकऱ्याच्या वारसांना मिळाला विम्याचा आधार

Solapur News | नुकसान भरपाई विम्याचा साडेपाच लाखांचा धनादेश सुपूर्द
Toramba farmer insurance
तोरंबा येथील शेतकरी महेश गायकवाड यांच्या कुटुंबियांना अपघात विम्याचा धनादेश देण्यात आला.Pudhari Photo
Published on
Updated on

तुळजापूर; पुढारी वृत्तसेवा : तुळजापूर तालुक्यातील तोरंबा येथील शेतकरी महेश मोहन गायकवाड यांचा जून महिन्यात वडगाव लाख पाटी येथे अपघात होऊन निधन झाले होते. त्यांची कौटुंबिक परिस्थिती लक्षात घेऊन त्यांना साडेपाच लाख रुपयांची मदत करण्यात आली.

गायकवाड कुटुंबामध्ये पाच मुली आणि जेमतेम शेती शेती व्यवसायावर उदरनिर्वाह करणारे घरातील कुटुंब प्रमुख गेल्याने गायकवाड कुटुंबीयांवर दुःखाचा डोंगर कोसळला. परंतु, महेश गायकवाड यांनी 265 रुपयांमध्ये युनायटेड इंडिया इन्शुरन्स कंपनीचा वैयक्तिक अपघात विमा काढला होता. या अपघात विम्याचा त्यांच्या पश्चात त्यांच्या कुटुंबीयांना मोठा आधार मिळाला आहे.

अपघाती विम्याचे साडेपाच लाख रुपये अॅक्सिडेंट क्लेम रिजनल ऑफिसच्या उपमहाव्यवस्थापक जयश्री नायर व तुळजापूर शाखेचे ब्रांच मॅनेजर निलेवार गिरी यांनी तोरंबा येथे त्यांच्या निवासस्थानी जाऊन महेश गायकवाड यांच्या पत्नी स्वाती गायकवाड यांना साडेपाच लाख रुपयांचा चेक सुपूर्द केला. संकटकाळी अचानक मिळालेल्या पैशामुळे गायकवाड कुटुंबीयाला आधार मिळाला.

अपघातामध्ये निधन पावलेले शेतकरी महेश गायकवाड यांनी अलीकडच्या काळात अगदी सहजपणे 265 रुपयांची ही युनायटेड इंडिया इन्शुरन्स कंपनीची पॉलिसी घेतली होती . त्याच 265 रुपयाच पॉलिसीमुळे त्यांच्या पश्चात कुटुंबीयांना साडेपाच लाख रुपयांचा लाभ मिळाला आहे.

Toramba farmer insurance
सोलापूर-मुंबई वंदे भारतमध्ये बिघाड

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news