

सोलापूर : गोवा, मुंबईनंतर सोलापूरहून हैदराबादसाठी दि. 17 एप्रिलपासून विमानसेवा सुरू होत आहे. आठवड्यात पाच दिवस ही सेवा सुरू असेल. याबाबत फ्लाय 91 कंपनीने त्यांच्या संकेतस्थळावर माहिती प्रसिद्ध केली. आता सोलापूर-तिरुपती विमानसेवेची प्रतीक्षा आहे.
मागील वर्षी जून महिन्यात सोलापूर ते गोवा विमान सुरू झाले. त्यानंतर सोलापूर ते मुंबई विमानसेवा सुरू झाली. या दोन्ही सेवांना प्रवाशांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे. सोलापूर-मुंबई-इंदौर अशी सेवा सुरू असून त्यानंतर आता सोलापूर ते हैदराबाद ही विमानसेवा 17 एप्रिलपासून सुरू होत आहे.