

सोलापूर; पुढारी वृत्तसेवा : शहरात एक तर उत्तर सोलापूर तालुक्यात दोघांनी वेगवेगळ्या कारणांतून आज (दि.31) गळफास घेऊन आपले जीवन संपविले. याप्रकरणी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
शहरातील भगवान नगर झोपडपट्टी पोलिस मुख्यालयाच्या सार्वजनिक पाण्याच्या टाकीला अज्ञात कारणावरून ओढणीच्या साह्याने गळफास घेत जीवन संपविले. विनायक बाबुराव पवार (वय 30, रा. भगवान नगर, झोपडपट्टी) असे मृताचे नाव आहे.
उत्तर सोलापूर तालुक्यातील नान्नज येथे आजाराला कंटाळून राहत्या घरी वृद्ध महिलेने जीवन संपविले. द्रौपदी महादेव गवळी (वय 71, रा. नान्नज, ता. उत्तर सोलापूर) असे गळफास घेतलेल्या महिलेचे नाव आहे.
उत्तर सोलापूर तालुक्यातील वडाळा येथे घरातील लोखंडी अँगलला गळफास घेत तरुणाने जीवन संपविले. श्रीकृष्ण विश्वास पवार (वय 30, रा. गवळी गल्ली, वडाळा, ता. उत्तर सोलापूर) असे मृत तरुणाचे नाव आहे. या तिघांनाही बेशुद्ध अवस्थेत सिव्हिल हॉस्पिटल येथे दाखल केले असता उपचारापूर्वीच डॉक्टरांनी त्यांना मृत झाल्याचे सांगितले.