Ladki Bahin Yojana: लाडकी बहीण योजनेच्या ई-केवायसीबाबत अफवा

सोशल मीडियावर मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या ई केवायसीबाबतच्या अफवेमुळे महिला व बाल विकास अधिकारी कार्यालय येथे सुरू महिलांनी प्रचंड गर्दी केली
ladki bahin yojana
ladki bahin yojanaPudhari
Published on
Updated on

सोलापूर : सोशल मीडियावर मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या ई केवायसीबाबतच्या अफवेमुळे महिला व बाल विकास अधिकारी कार्यालय येथे सुरू महिलांनी प्रचंड गर्दी केली होती. त्यामुळे संभाजी ब्रिगेडने जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी यांना भेट घेऊन प्रत्यक्ष माहिती घेऊन परिस्थिती जाणून घेतली. नागरिकांनी अफवांवर विश्वास ठेवून या कार्यालयात गर्दी करू नये, असे आवाहन संभाजी ब्रिगेडच्या वतीने करण्यात आले.

या योजनेच्या लाभार्थी महिलांमध्ये संभ्रम निर्माण होऊन सात रस्ता येतील जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी कार्यालयामध्ये महिलांची गर्दी झाली. त्याचबरोबर तेथील झेरॉक्स दुकानदार तीन रुपयेचा केवायसी फॉर्म 25 रुपयाला विक्री करताना आढळून आले. प्रत्यक्षात त्या कार्यालयामध्ये दोन पोर्टल सुरू असून त्या पोर्टलवर केवायसी केले आहे का, याची तपासणी करण्याचे काम सुरू आहे.

जिल्हा महिला व बालकल्याण समिती कार्यालय सात रस्त्याला एका सोसायटीमध्ये भाड्याने असून ते नागरिकांच्या गैरसोयीचे आहे. त्यामुळे हे कार्यालय जुन्या जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये हलवण्याची मागणी संभाजी ब्रिगेडच्यावतीने जिल्हाधिकाऱ्यांना करण्यात येणार आहे. यावेळी संभाजी ब्रिगेडचे पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष अनिल कदम, जिल्हाध्यक्ष संभाजीराजे भोसले, महिला आघाडीच्या जिल्हाध्यक्षा मीनल दास, जिल्हा उपाध्यक्ष मनीषा कोळी, उत्तर तालुका प्रमुख विक्रम वानकर, जिल्हा संघटक विशाल साळुंखे आदी उपस्थित होते.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news