Solapur News : सोलापूर जिल्ह्यातील ऊस दराची कोंडी अखेर फुटली; प्रतिटन ३,४५० रुपये दर निश्चित

शेतकरी संघटनांच्या आंदोलनाला मोठे यश; गुलाल उधळत आणि साखर वाटून शेतकऱ्यांचा जल्लोष

Solapur Sugarcane Rate
प्रातिनिधिक छायाचित्र. File Photo
Published on: 
Updated on: 

Solapur Sugarcane Rate : गेल्या काही दिवसांपासून सोलापूर जिल्ह्यात सुरू असलेला ऊस दराचा तिढा अखेर सुटला असून, यंदाच्या हंगामासाठी उसाला प्रतिटन ३,४५० रुपये भाव देण्याचे निश्चित झाले आहे. ३२५० पहिली उचल देण्‍याचे ठरले असून उर्वरीत २०० रुपये दोन टप्‍प्‍यात देण्‍यात येणार आहेत. या निर्णयामुळे जिल्ह्यातील लाखो ऊस उत्पादक शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे.

प्रतिटन ३,४५० रुपये दर निश्चित

ऊस दराच्या मागणीसाठी जिल्ह्यातील विविध शेतकरी संघटनांनी गेल्या काही दिवसांपासून आक्रमक पवित्रा घेत आंदोलन सुरु केले होते. याची या आंदोलनाची दखल घेत साखर कारखानदार आणि शेतकरी संघटनांच्या प्रतिनिधींमध्ये महत्त्वाची चर्चा झाली. या बैठकीत कारखानदारांनी प्रतिटन ३,४५० रुपये दर देण्यास सहमती दर्शवली असून, याबाबतचे अधिकृत दर मान्यतेचे पत्रही शेतकरी संघटनांना सुपूर्द केले आहे.


Solapur Sugarcane Rate
Solapur News : चौपदरीकरणासाठी भूसंपादन सुरू

गुलाल उधळत आणि साखर वाटून शेतकऱ्यांचा जल्लोष

शेतकरी संघटनांच्या लढ्याला हे मोठे यश मानले जात आहे. कारखानदारांकडून दर मान्यतेचे पत्र मिळताच, शेतकरी संघटनांचे पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी एकमेकांना साखर वाटून व गुलालाची उधळण करत जोरदार जल्लोष केला. ऊस दराचा प्रश्न मार्गी लागल्यामुळे आता जिल्ह्यातील साखर कारखान्यांचा गळीत हंगाम सुरळीतपणे सुरू होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.


Solapur Sugarcane Rate
Solapur News| एसटीचे स्मार्ट कार्ड हरवल्यास नवे कार्ड काढता येणार

जिल्‍ह्यातील आठ साखर कारखान्यांनी जाहीर केला होता दर

कोल्हापूर, सांगली आणि सातारा जिल्ह्यासह इतर जिल्‍ह्यातील साखर कारखानदारांनी ऊस दर जाहीर केला. या तुलनेत सोलापूर जिल्ह्यातील सात ते आठ साखर कारखान्यांनी प्रतिटन ३,१५० रुपये दर जाहीर केला होता. ऊस दरासंदर्भात पुढील आंदोलनाची रणनीती आणि ठोस भूमिका ठरवण्यासाठी पंढरपूर येथील शासकीय विश्रामगृह येथे ऊस उत्पादक शेतकऱ्यांची महत्त्वाची बैठक पार पडली होती.


Solapur Sugarcane Rate
Solapur News| बदलत्या हवामानात हरवतेय पक्ष्यांची दुनिया; जपूया सोलापूरचे पक्षीवैभव

पहिली उचल ३६००ची करण्‍यात आली होती मागणी

सोलापूर जिल्ह्यातील ऊस उत्पादक शेतकऱ्यांना पहिली उचल ३६००, कारखाना बंद झाल्यानंतर १०० रुपये तर पुढील हंगाम सुरू होण्याआधी २०० व साखरेचा दर ४५ रुपयांच्या पुढे राहिल्यास ७०/३० फॉर्म्युलानुसार दर जाहीर करण्याची मागणी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे संस्थापक अध्यक्ष राजू शेट्टी यांनी रविवार,८ नोव्‍हेंबर रोजी पंढरपुरात झालेल्या शेतकऱ्यांच्या बैठकीत केली. १५ नोव्हेंबरपर्यंत साखर कारखानदार व जिल्हा प्रशासनाने तोडगा न काढल्यास १६ नोव्हेंबर रोजी सोलापूर जिल्हाधिकारी कार्यालयावर धडक मोर्चा काढण्यात येणार असल्‍याची घोषणा करण्‍यात आली होती.


Solapur Sugarcane Rate
Solapur Railway News : स्लीपर वंदे भारतने मुंबईत जाणार ४० मिनिटे आधी

जिल्‍हाधिकारी कार्यालयावर मोर्चा

यंदाच्या गळीत हंगामात उसाला जिल्ह्यातील साखर कारखान्यांनी पहिली उचल प्रति टन ३५०० रुपये मिळावे या प्रमुख मागणीसाठी स्‍वाभिमानी शेतकरी संघटनेच्‍या वतीने सोमवारी (दि. १६) जिल्‍हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढला. याकडे जिल्‍हा प्रशासनाने दुर्लक्ष केल्‍याने शेतकऱ्यांनी रात्री उशिरापर्यंत जिल्‍हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन सुरुच ठेवले. यावेळी स्‍वाभिमानी शेतकरी संघटनेचे सर्वेसर्वा तथा माजी खा. राजू शेट्टी, रासपचे नेते महादेव जानकर यांची प्रमुख उपस्‍थिती होती.त्‍यावेळी जिल्‍हाधिकारी एस. कार्तिकेयन यांनी साखर कारखानदारांशी चर्चा करुन पुन्‍हा बैठक घेऊन दराविषयी निर्णय देण्याचे आश्वासन दिले. मात्र, यावर तोडगा न निघाल्‍याने रात्री उशिरापर्यंत जिल्‍हाधिकारी कार्यालयावर शेतकऱ्यांचे ठिय्या आंदोलन सुरुच होते.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.