

सोलापूर : सोलापूर शहरातील वाहतुकीवरील ताण कमी होण्यासाठी मोहोळ ते वळसंग या मार्गाचे चौपदरीकरणाच्या कामास मंजुरी मिळाली असून, त्यासाठी भूसंपादन सुरु करण्यात आले आहे. केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालयाने राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ९६५ वरील मोहोळ-वळसंग चौपदरीकरणाचे काम हाती घेण्यात आले आहे.
मोहोळ-वळसंग रस्ता सोलापूर-विजापूर राष्ट्रीय महामार्ग क्रमांक १३ चा ४२ किमीचा टप्पा असून, ६ वर्षांपासून प्रतीक्षेत असलेला भूसंपादनाचा आणि मार्गाचा अडथळा दूर करण्याचा निर्णय केंद्र शासनाने घेतला आहे. शेतकऱ्यांकडून १२ दिवसांत सूचना व हरकती मागवण्यात आल्या आहेत. या प्रकल्पामुळे सोलापूर शहरावर वाढत चाललेला वाहतुकीचा ताण कमी होण्यास मदत होणार आहे.
मोहोळ ते वळसंग दरम्यानच्या ४२ किमीच्या मार्गावर चौपदरीकरण केले जाणार आहे. या कामासाठी सोलापूर तालुक्यातील बाळेवाडी, आहेरवाडी, सिद्धवाडी, राजूर, सांगदेव, बंकलगी, बोळकवठे, करमाळा, झेंबाडी, मेंढू, होनमुर्गी, आरेगाव, वळसंग, कंदलगाव आणि वळसंग यासह आदी १७ गावांमधील ४२.२२ हेक्टर जमिनीचे संपादन करण्यात येणार आहे. या भूसंपादनासाठी काही हरकती असणाऱ्यांनी सादर केले आहेत. या भूसंपादनासाठी काही हरकती असणाऱ्यांनी २१ दिवसांत हरकती नोंदवण्याचे प्रशासनाने आवाहन केले आहे.