Solapur SSC Result 2026: दहावी परीक्षेत मुलीच हुशार!

जिल्ह्याचा निकाल 91.31 टक्के; 87.91 टक्के मुले, तर 95.32 टक्के मुली उत्तीर्ण
SSC Result
SSC ResultPudhari
Published on
Updated on

सोलापूर : माध्यमिक व उच्च माध्यमिक विभागाच्या वतीने घेण्यात आलेल्या दहावीच्या परीक्षेचा निकाल 91.31 टक्के लागला. यामध्ये 87.91 टक्के मुले तर 95.32 टक्के मुली उत्तीर्ण झाल्या. मुलांपेक्षा मुलीच दहावीच्या परीक्षेत हुशार असल्याचे सिद्ध झाले.

माध्यमिक व उच्च माध्यमिक विभागाच्या वतीने 20 फेबु्रवारी ते 18 मार्च या कालावधीत दहावीची परीक्षा घेण्यात आली. या परीक्षेत 65 हजार तीन विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती. त्यातील 64 हजार 315 विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली. त्यापैकी 58 हजार 727 विद्यार्थी उत्तीर्ण झाले. यामध्ये 87.91 टक्के मुले, तर 95.32 टक्के मुली उत्तीर्ण झाल्या.

दरम्यान, दहावीची परीक्षा कॉपीमुक्त व्हावी, यासाठी माध्यमिक शिक्षण विभागाकडून कॉपीमुक्त अभियान राबवून प्रत्येक परीक्षा केंद्रांवर सीसीटीव्हीद्वारे नजर ठेवून प्रत्येक केंद्रावर भरारी पथकांची नियुक्त करण्यात आल्याने काही केंद्र वगळता इतर सर्व केंद्रांवर कॉपीमुक्त परीक्षा झाली.

ऑनलाईन सेंटरवर विद्यार्थ्यांची गर्दी

दहावी परीक्षेचा निकाल ऑनलाईन लागल्यानंतर तो पाहण्यासाठी शहर-जिल्ह्यातील अनेक ऑनलाईन सेंटरवर पालकांसह विद्यार्थी-विद्यार्थीनींनी गर्दी केल्याचे दिसून आले. काहींनी मोबाईलवर ऑनलाईन निकाल पाहण्याचा प्रयत्न केला.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news