Inter Caste Marriage : आंतरजातीय दाम्प‍त्यांस ५० हजार रुपये अनुदान

सामाजिक न्याय विभागाची योजना; सर्व प्रवर्गातील जोडप्यांना मिळेल लाभ
Marriage
MarriagePudhari
Published on: 
Updated on: 

​सोलापूर : राज्यातील सामाजिक एकोप्याला चालना देण्यासाठी सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाकडून आंतरजातीय विवाहासाठी प्रोत्साहन योजना राबवली जाते. यातून पात्र जोडप्यांना शासन ५० हजार रूपये आर्थिक सहाय्य देते. खुल्या प्रवर्गातील दोन वेगवेगळ्या जातीतील जोडपे तसेच यातून अनुसूचित जाती व जमाती प्रवर्गातील जोडप्यांना ५० हजार रूपयांचे अनुदान दिले जाते.

​या योजनेचा लाभ मिळण्यासाठी पती किंवा पत्नी या दोघांपैकी एक व्यक्ती मागासवर्गीयातील दोन वेगवेगळ्या जातीचे असणे बंधनकारक आहे. तसेच खुल्या प्रवर्गातीलही दोन वेगवेगळे जातीतील असणे गरजेचे आहे. दोघेही एकाच जातीतील असल्यास ही सवलत मिळत नाही.

हे आहेत नियम

पती-पत्नी दोघेही महाराष्ट्राचे कायमचे रहिवासी असावेत.

मुलाचे वय २१ वर्षे आणि मुलीचे वय १८ वर्षे पूर्ण असावे.

'हिंदू विवाह कायदा १९५५' किंवा 'विशेष विवाह कायदा १९५४' अंतर्गत नोंदणीकृत असावा.

दोघांचेही हे पहिलेच लग्न असणे आवश्यक आहे.

हे कागदपत्र आवश्यक

विवाह नोंदणी प्रमाणपत्र

पती आणि पत्नी दोघांचे जातीचे प्रमाणपत्र

दोघांचे शाळा सोडल्याचा दाखला किंवा वयाचा पुरावा

रहिवासी प्रमाणपत्र

आधार कार्ड आणि जोडीदारासोबतचे संयुक्त बँक खाते पासबुक

दोन प्रतिष्ठित व्यक्तींचे शिफारस पत्र

जोडप्याचा संयुक्त फोटो

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news