Solapur Murder Case : प्रतापसिंह करचे खूनप्रकरणी शिंदे सेनेच्या नेत्यावर आरोप

मुख्य सूत्रधाराला अटक करण्याची पत्नीची मागणी
Crime News
Crime Newspudhari photo
Published on: 
Updated on: 

सांगोला : भाजप युवा मोर्चाचे माजी तालुकाध्यक्ष प्रतापसिंह करचे यांची हत्या आटपाडी येथील शिंदे सेनेचे नेते व सांगली जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे संचालक तानाजी पाटील, त्यांचे बंधू शिवाजी पाटील आणि जिल्हा परिषद सदस्य रोहन पाटील यांनी कट रचून सुपारी देऊन घडवून आणल्याची लेखी तक्रार पत्नी अर्चना करचे यांनी सोलापूरच्या जिल्हा पोलिस अधीक्षकांकडे दिली आहे. तिप्पेहळी (ता. सांगोला) येथे २७ ऑक्टोबर रोजी मध्यरात्री २ च्या सुमारास प्रतापसिंह करचे यांची गोळ्या झाडून हत्या करण्यात आली होती.

प्रतापसिंह करचे हे स्वतःच्या चारचाकी गाडीतून प्रवास करत असताना त्यांच्यासोबत असलेले संशयित हर्षवर्धन ऐवळे आणि विक्रम घरडे यांनी बंदुकीतून गोळ्या झाडून त्यांची हत्या केली होती. याप्रकरणी सांगोला पोलिस ठाण्यात हत्येचा गुन्हा दाखल करण्यात आला. संशयितांना अटक करण्यात आली.

या हत्येमागे राजकीय कट असल्याचा गंभीर आरोप अर्चना करचे यांनी केला आहे. राज्यात भाजपचे सरकार असतानाही एका भाजप कार्यकर्त्याची अशी हत्या होत असेल तर सर्वसामान्यांचे काय, असा सवाल उपस्थित करत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी न्याय द्यावा, अशी मागणी अर्चना करचे यांनी केली आहे. करचे कुटुंबीयांनी पोलिस अधीक्षकांना भेटून खुनाचे मुख्य सूत्रधारांना अटक करावी, अशीही मागणी केल्याची माहिती समोर आली आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.