Sachin Kalyanshetti Death Threat: आ.कल्‍याणशेट्टींना मारण्यासाठी एक कोटी रुपयांची ऑफर

हुळ्ळेने चालक सुरवसेला दाखवले आमिष
Sachin Kalyanshetti Death Threat: आ.कल्‍याणशेट्टींना मारण्यासाठी एक कोटी रुपयांची ऑफर
Published on
Updated on

सोलापूर : आ. सचिन कल्‍याणशेट्टी यांना गोळ्या घालून ठार मारण्याची श्रीशैल हुळ्ळे याने चालक आनंद सुरवसे याला एक कोटी रुपयांची ऑफर दिल्याचे समोर आले आहे. एवढे पैसे हुळ्ळे कुठून देणार होता, त्‍याच्‍या पाठीमागे कोण आहे, याची चर्चा सध्या सोलापुरात सुरू झाली आहे.

अक्कलकोटचे आ. सचिन कल्‍याणशेट्टी यांना गोळी घालून ठार मारण्याचे आमिष त्‍यांच्‍या चालकाला दाखविल्याचा गंभीर प्रकार समोर आल्यानंतर शहरासह जिल्‍ह्यात एकच खळबळ उडाली आहे. या प्रकरणी श्रीशैल हुळ्ळे (रा. वडदेगाव, ता. दक्षिण सोलापूर) आणि प्रभाकर हणमंत फुलारी (वय २३, रा. मल्‍लिकार्जुन नगर, अक्‍कलकोट रोड, सोलापूर) या दोघांवर सदर बझार पोलिसात गुन्‍हा दाखल आहे. यातील प्रभाकर फुलारी याला पोलिसांनी अटक केली असून तो सध्या पोलिस कोठडीत आहे. या दोघांनी कल्‍याणशेट्टी यांचे चालक आनंद स्‍वामीराव सुरवसे याला गाठून ही ऑफर दिली.

हुळ्ळे याने सुरवसेला या कामासाठी एक कोटी रुपये देऊ केल्याची माहिती सूत्रांनी दिली. हुळ्ळे याने एक कोटी रुपयांची ऑफर दिल्यानंतर सुरवसे हा हबकून गेला. हुळ्ळे एवढे पैसे कुठून देणार होता, त्‍याच्‍या पाठीमागे कोण आहे याबाबत सोलापूरसह अक्कलकोट तालुक्यातील राजकीय क्षेत्रातून चर्चेला उधाण आले आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news