Solapur Car Accident | सोलापूर-पुणे महामार्गावर कारचा भीषण अपघात; आठ वर्षांच्या मुलासह तिघांचा मृत्यू, दाम्पत्य जखमी

शेटफळ-तेलंगवाडी दरम्यान कार आणि कंटेनरची जोरदार धडक; दीपावलीचे साहित्य खरेदी करून परतताना काळाचा घाला
Solapur Pune Highway Accident
Solapur Pune Highway AccidentPudhari
Published on: 
Updated on: 

Solapur Pune Highway Accident

मोहोळ : सोलापूर-पुणे महामार्गावर मोहोळ तालुक्यातील शेटफळ ते तेलंगवाडी गावादरम्यान कार आणि कंटेनर यांच्यात झालेल्या भीषण अपघातात आठ वर्षांच्या मुलासह तिघांचा जागीच मृत्यू झाला, तर अन्य दोघे गंभीर जखमी झाले. शुक्रवारी (दि.६) दुपारी अडीच वाजण्याच्या सुमारास वडाचीवाडी गावाच्या हद्दीत ही दुर्घटना घडली. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.

या अपघातात पार्थ तुषार भारंबे (वय ८), विलास चांगु भारंबे (वय ६६) आणि शोभा विलास भारंबे (वय ६३, तिघेही रा. कल्याण) यांचा मृत्यू झाला. तर तुषार विलास भारंबे आणि पूनम तुषार भारंबे हे पती-पत्नी जखमी झाले आहेत. त्यांना तातडीने उपचारासाठी सोलापूर येथे हलविण्यात आले आहे.

Solapur Pune Highway Accident
Solapur News : माढा ग्रामीण रुग्णालयावर आरोग्यमंत्र्यांची नाराजी

मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, भारंबे कुटुंबीय कारमधून सोलापूर-पुणे महामार्गावरून प्रवास करत होते. दीपावलीसाठी आवश्यक साहित्य खरेदी करून ते परतत असताना वडाचीवाडी गावाच्या हद्दीत त्यांच्या कारची कंटेनरला जोरदार धडक बसली. धडक इतकी भीषण होती की, कारमधील तिघांचा जागीच मृत्यू झाला. तर अन्य दोघे गंभीर जखमी झाले.

अपघाताची माहिती मिळताच परिसरातील नागरिकांनी घटनास्थळी धाव घेत मदतकार्य सुरू केले. अपघातात मृत आणि जखमी झालेले रस्त्यावर पडले होते. घटनेची माहिती मिळताच मोहोळ पोलीस ठाण्याचे अपघात पथक तातडीने घटनास्थळी दाखल झाले. जखमींना उपचारासाठी रुग्णालयात पाठविण्यात आले.

Solapur Pune Highway Accident
Solapur Court Verdict | मोहोळ खून प्रकरण: दोघांना जन्मठेप; प्रत्येकी १० हजारांचा दंड

या दुर्घटनेमुळे महामार्गावरील वाहतुकीवर काही काळ परिणाम झाला. अपघात नेमका कशामुळे झाला, याचे कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. याप्रकरणी पोलिसांकडून अधिक तपास सुरू असून, तपासानंतर अपघाताचे नेमके कारण स्पष्ट होणार आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.