सोलापूर : पुढारी वृत्तसेवा : वाळू चोरीची कारवाई न करण्यासाठी व तहसीलदारांना अहवाल न पाठवण्यासाठी २० हजारांची लाच मागून १५ हजारांची लाच घेताना पोलीस नाईक याला सोलापूर लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने ताब्यात घेतले. दत्तात्रय रामचंद्र कांबळे ( सलगरवस्ती पोलीस स्टेशन, सोलापूर शहर) असे अटक केलेल्या पोलीस नाईकाचे नाव आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, तक्रारदार यांचे मौजे कवठेगाव येथे घराचे बांधकाम सुरू असून बांधकामासाठी लागणारी वाळू तक्रारदार यांनी त्यांच्या भावाच्या घरासमोर रस्त्याच्या कडेला टाकली होती. दि 7 जुलैरोजी आरोपी कांबळे यांनी तक्रारदार यांच्या भावास सदरची वाळू चोरीची आहे. तुमच्याविरुद्ध गुन्हा दाखल करतो, असे म्हणून तक्रारदार यांच्या भावास पोलीस स्टेशनला घेऊन गेले. त्यानंतर सदर प्रकरण मिटवण्यासाठी २० हजार लाचेची मागणी केली. त्यानंतर याची माहिती लाचलुचपत प्रतिबंधक विभागाला देण्यात आली,
त्यानंतर तडजोडी अंती ठरलेली १५०० हजारांची लाच घेताना त्याला ताब्यात घेतले. या प्रकरणी सलगरवस्ती पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे. ही कारवाई चंद्रकांत कोळी, पोलीस निरीक्षक, पोलीस अंमलदार शिरीषकुमार सोनवणे, प्रमोद पकाले, श्रीराम घुगे, स्वामीराव जाधव, अतुल घाडगे, संतोष नरोटे, राहुल गायकवाड यांनी केली.
हेही वाचा