Solapur Municipal Corporation: शाळा नको, तुमचा महापौर बंगला विका

मनपाच्या शाळा व सार्वजनिक मालमत्ता बीओटीवर देण्यास ‘वंचित’चा तीव्र विरोध
Solapur Municipal Corporation: शाळा नको, तुमचा महापौर बंगला विका
Published on
Updated on

सोलापूर : महानगरपालिकेच्या शाळा व मोक्याच्या सार्वजनिक जागा बीओटी तत्त्वावर किंवा विक्री करण्याचा प्रस्ताव आणला जात असल्याच्या पार्श्वभूमीवर वंचित बहुजन आघाडीच्या वतीने तीव्र आंदोलन करण्यात आले.

शाळा विकून पाणी नको; विद्यार्थ्यांचे भविष्य वाचवा! पाणीपुरवठा हा सोलापूरकरांचा मूलभूत हक्क आहे. शहराला पुरेसा आणि नियमित पाणीपुरवठा मिळायलाच हवा. मात्र, त्यासाठी शाळा, मैदाने, बागा आणि सार्वजनिक उपयोगाच्या मोक्याच्या जागा खासगी विकासकांच्या ताब्यात देणे हा विकासाचा मार्ग असू शकत नाही. महापालिकेच्या शाळा या केवळ इमारती किंवा जमिनीचे तुकडे नाहीत; त्या हजारो विद्यार्थ्यांच्या भविष्याशी जोडलेल्या सार्वजनिक संपत्ती आहेत. महापौरांनी शाळांकडे मालमत्ता म्हणून नव्हे, विद्यार्थ्यांचे भविष्य म्हणून पाहावे!

सार्वजनिक मालमत्ता विकायचीच असेल तर सुरुवात महापौर बंगल्यापासून करा! हाच निधी उभारण्याचा मार्ग असेल, तर सर्वप्रथम महापौरांचा बंगला आणि पदाधिकाऱ्यांच्या अनावश्यक सुविधांचा त्याग करण्याची तयारी दाखवा, असे वंचित बहुजन आघाडीच्या वतीने अधोरेखित करण्यात आले.

शाळा विकण्याचा प्रस्ताव मागे घेतला नाही तर वंचित बहुजन आघाडीच्या वतीने नागरिक, पालक, विद्यार्थी व सामाजिक संघटनांना सोबत घेऊन अधिक तीव्र लोकशाही आंदोलन छेडण्यात येईल, असा इशारा देण्यात आला. यावेळी आतिश बनसोडे, महेश जाधव, नरेंद्र शिंदे, सुहास सावंत, विनोद इंगळे, गौतम थापटे, मनोज भालेराव, प्रज्वल प्रसन्न, शाहिद शेख, रोहीत लालसरे, आदींसह पदाधिकारी व कार्यकर्ते बहुसंख्येने उपस्थितीत होते.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news