Solapur Municipal Election Result| प्रभाग 5, 7, 15 मध्ये धक्कादायक उलथापालथ

निवडणुकीत मतदारांचा भाजपला कौल
Solapur Municipal Corporation |
सोलापूर महानगरपालिकाFile Photo
Published on
Updated on

सोलापूर : महापालिकेच्या निवडणूक निकालांनी शहराच्या राजकारणात मोठी उलथापालथ घडवून आणली आहे. प्रभाग क्रमांक 5, 7 आणि 15 मध्ये झालेले निकाल अनेक दिग्गज नेत्यांसाठी धक्कादायक ठरले असून भाजपने या निवडणुकीत आपली ताकद पुन्हा एकदा सिद्ध केली आहे.

Solapur Municipal Corporation |
Pune Municipal Election Result : प्रभाग २८ मध्ये 'कांटे की टक्कर'; अवघ्या २२८ मतांनी सूरज लोखंडे विजयी, भाजपचा अश्वमेध रोखला

प्रभाग क्रमांक 5 मध्ये परिवर्तन राष्ट्रवादी काँग्रेसचे तब्बल तीन टर्म महापालिकेत प्रतिनिधित्व केलेले आनंद चंदनशिवे यांचा पराभव झाला. त्यांच्यासोबतच त्यांचे सहकारी माजी नगरसेवक गणेश पुजारी यांनाही पराभवाचा सामना करावा लागला. या प्रभागात आजवर भाजपविरोधी पक्षांचे नगरसेवक निवडून येत होते; मात्र यंदा चित्र पूर्णपणे बदलले. भाजपचे तब्बल चार उमेदवार येथे विजयी झाले. भाजपमध्ये नुकतीच प्रवेश केलेल्या माजी नगरसेविका मंदाकिनी तोडकरी यांचा विजय झाला. विशेष बाब म्हणजे गेली वीस वर्षे नगरसेवक पदासाठी प्रयत्न करणारे बिज्जू प्रधाने यांना अखेर यंदा यश मिळाले असून, भाजपच्या कमळ चिन्हावर ते विजयी झाले. मतदारांनी भाजपला कौल दिला असला तरी आ. देशमुख आणि आ. कोठे यांच्या पारड्यात प्रत्येकी दोन उमेदवार टाकले.

प्रभाग क्रमांक 7 मध्ये भाजपचे संपूर्ण पॅनल येथे विजयी झाले. शिवसेनेचे माजी जिल्हाप्रमुख गणेश वानकर यांनी ऐनवेळी भाजपमध्ये प्रवेश करून शिवसेनेविरोधातच पॅनल उभे केले. गतवर्षी एकाच पॅनलमधून विजयी झालेले गणेश वानकर आणि मनोज शेजवाल यंदा आमनेसामने आले. या लढतीत वानकर यांनी शेजवाल यांचा धक्कादायक पराभव करत स्वतःसह तीन नवख्या उमेदवारांना विजयश्री मिळवून दिली. दरम्यान, शहरातील सर्वात ‌‘हॉट‌’ समजल्या जाणाऱ्या प्रभागात दोन तालमीतील पैलवान आमने-सामने होते. नाना काळे आणि अमोल शिंदे यांच्यात निकराची लढत झाली. अमोल शिंदे यांनी माजी उपमहापौर नाना काळे यांचा तब्बल चार हजार मताधिक्याने पराभव केला. या प्रभागात भाजपला केवळ एका जागेवर समाधान मानावे लागले. प्रभाग क्रमांक 15 मध्येही भाजपच्या पॅनलने बाजी मारली. काँग्रेसचे शहराध्यक्ष चेतन नरोटे यांचा भाजपत प्रवेश केलेले बाबा करगुळे यांच्याशी सामना झाला, तर माजी महापौर आरिफ शेख यांची लढत विद्यमान नगरसेवक विनोद भोसले यांच्याशी झाली. या निवडणुकीत विनोद भोसले यांनी माजी महापौर आरिफ शेख यांचा पराभव करत विजय मिळवला. चेतन नरोटे यांनी शेवटच्या फेरीत 249 मतांनी बाबा करकुळे यांचा पराभव केला.

Solapur Municipal Corporation |
Sangli Municipal Election Result: सांगलीत भाजप सत्तेच्या उंबरठ्यावर

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news