Solapur Municipal Election Result | सोलापूर महापालिकेत भाजपची बहुमताकडे वाटचाल; काँग्रेसचा सुपडा साफ

शिंदे शिवसेना, अजित पवारांच्या राष्ट्रवादीचा करिष्मा चालला नाही
Solapur BJP vs Congress result
Solapur Municipal Election bpj Win Pudhari
Published on
Updated on

Solapur BJP vs Congress result

सोलापूर : बहुचर्चित अशा सोलापूर महानगरपालिकेच्या निवडणुकीचे निकाल हळूहळू स्पष्ट होत आहेत. दुपारी तीन वाजेपर्यंत हाती आलेल्या निकाल आणि कल यानुसार पुन्हा एकदा भाजप दणदणीत बहुमताकडे वाटचाल करू लागल्याचे चित्र आहे. दुसऱ्या स्थानावर एमआयएम असून, शिवसेना शिंदे गट व अजित पवारांच्या युतीला म्हणावा तसा करिष्मा करता आलेला नाही. काँग्रेसचा सुपडा साफ झाल्याचे आत्तापर्यंतच्या निकालवरून दिसत आहे. माकप, एमआयएम, शरद पवारांची राष्ट्रवादी, ठाकरे शिवसेनेचीही तिच गत झाल्याचे सध्यातरी चित्र आहे.

102 जागांसाठी अटीतटीची लढत झाली. सर्वच्या सर्व म्हणजे 102 जागांवर एकट्या भाजपनेच उमेदवार दिले. अन्य पक्षांना सर्व ठिकाणी उमेदवार देखील मिळाले नसल्याचे वास्तव आहे.

तब्बल आठ वर्षांनतर झालेली ही निवडणूक एका खुनामुळे राज्यभर गाजली. तसेच पालकमंत्री जयकुमार गोरे, आ. देवेंद्र कोठे विरूद्ध शिवसेनेचे नेते अमोल शिंदे यांच्यातील वादाची ठिणगी खालच्या पातळीवरील टिकेपर्यंत गेल्यामुळे या निवडणुकीला गालबोट लागले.

Solapur BJP vs Congress result
Solapur ZP Elections: जि.प. निवडणुकीत आवताडे सत्ता राखतील की भालके जिंकतील?

विविध राजकीय पक्षातील नेत्यांना भाजपने आयत केले, शिंदे शिवसेना नेत्यांची कोडी केली, अनेकांशी ‌‘अर्थपूर्ण‌’ वाटाघाटी केल्या, मुख्यमंत्र्यांसह पालकमंत्री व तिन्ही आमदारांची फौज प्रचारात दिमतीला ठेवली. याचा परिपाक म्हणजे भाजपला महापालिकेत ऐतिहासिक विजय मिळत असल्याचे दिसत आहे. दुपारी तीन पर्यंत हाती आलेल्या वृत्तानुसान भाजपाने 75 चा आकडा पार केला आहे. त्यानंतर एमआयएम आठ, शिंदेसेना एक तर काँग्रेसने एक जागी विजय मिळवला आहे.

ही निवडणूक महायुती विरूद्ध महाविकास आघाडी अशी होईल अशी चर्चा होती. मात्र, भाजपला स्वबळावरच ही निवडणूक लढवण्याची सुप्त इच्छा होती आणि घडले किंवा घडविलेही तसेच. यामुळे एकाकी पडलेली शिंदे शिवसेना आणि उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसची युती झाली. त्यामुळे भाजपच्या सर्व उमेदवारांविरूद्ध या युतीने सर्व ठिकाणी उमेदार दिले. त्यामुळे सोलापुरातील सामना हा तसा सत्ताधाऱ्यांतच रंगला. याचे वर्णन आज मतमोजणीचे चित्र पुढे आल्यानंतर सत्ताधारी लढले, सत्ताधारीच हरले आणि सत्ताधारीच जिंकले असेच करावे लागते.

Solapur BJP vs Congress result
Solapur ST bus delay: एसटी बसेस वेळेवर सुटत नसल्याने प्रवाशांचे हाल

निवडणुकीचे पडसाद

- ही निवडणूक भाजपने पूर्ण बहुमताने जिंकल्यास पालकमंत्री जयकुमार गोरे यांचे स्थान आणखी भक्कम होणार

- शहरातील तिन्ही विधानसभा मतदार संघात ज्या त्या आमदारांनी आपापले वर्चस्व सिद्ध केल्याचे यानिमित्ताने अधोरेखित

- आता तरी सोलापूरच्या लोकप्रतिनिधींना राज्याच्या मंत्रीमंडळात संधी मिळण्याची शक्यता अधिक उंचावेल

- भाजपने दूर सारूनही जर शिंदे शिवसेना ही दुसऱ्या क्रमांकावर राहिल्याने भाजपला शिंदे शिवसेनेला कमी लेखून चालणार नाही

- एमआयएमने यंदाही आठ ठिकाणी आपला झेंडा रोवला.

- सोलापूर महापालिकेवर दीर्घकाळ सत्ता भोगलेल्या काँग्रेसचा या निवडणुकीत सुपडा साफ झाला

- नेत्यांचे दुर्लक्ष, पक्षाचे नेते दुसऱ्या पक्षात जाणे, आर्थिक कमकुवतपणा, स्टार प्रचारकांची वनावा यामुळे काँग्रेसचा दणदणीत पराभव झाला

- माकप, वंचित, मनसे, एमआयएम या छोट्या पक्षांची चिंता यानिमित्ताने वाढली आहे. कारण या सर्व पक्षांचा जनाधार उजव्या विचारसरणीच्या भाजप, शिंदे शिवसेना यांनी तर काही प्रमाणात अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसने गिळंकृत केल्याचे या निवडणुकीत स्पष्ट झाले

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news