सोलापूरहून मुंबई, गोव्याचे विमानाचे तिकीट दर जाहीर

Flight Ticket : सोलापूरहून मुंबई, गोव्याचे विमानाचे तिकीट दर जाहीर
solapur news
सोलापूरहून मुंबई, गोव्याचे विमानाचे तिकीट दर जाहीर Pudhari File Photo
Published on: 
Updated on: 

सोलापूर : पुढारी वृत्तसेवा : सोलापूरकरांसाठी आनंदाची बातमी आहे. सोलापूर-मुंबई अन् सोलापूर-गोवा या थेट हवाई मार्गाचे फ्लाय९१ कंपनीचे तिकीट दर जाहीर झाले आहेत. हे तिकीट दर स्वस्त आणि प्रवाशांच्या बजेटमध्ये बसणारे आहेत. या नव्या सेवेमुळे सोलापूरकरांना विमान प्रवासाचा जलद आणि आरामदायी पर्याय मिळणार आहे.

सोलापूर विकास मंचचे सदस्य विजय कुंदन जाधव यांनी फ्लाय९१ कंपनीच्या अधिकाऱ्यांना या संदर्भात इ-मेलद्वारे माहिती मागितली होती. त्यास सकारात्मक प्रतिसाद मिळाला आहे. सोलापूर ते मुंबई प्रारंभिक दर फक्त एक हजार ४८८ रुपयांपासून सुरू होतो. तर सोलापूर ते गोवा प्रारंभिक दर फक्त ६८९ रुपये आहे.

सोलापूर ते मुंबई थेट मार्गावर तिकिटांचा प्रारंभिक दर फक्त एक हजार ४८८ रुपयांपासून सुरू होतो. विविध स्लॅबमध्ये दर वाढत जातात. जे प्रवाशांच्या मागणी आणि उपलब्धतेनुसार ठरवले जातात. उच्चतम दर नऊ हजार ५८४ रुपयांपर्यंत आहे. अतिरिक्त शुल्कात २१७ रुपये युजर डेव्हलपमेंट फी, २३६ रुपये विमान सुरक्षा शुल्क आणि पाच टक्के जीएसटी यांचा समावेश होतो.

सोलापूर ते गोवा थेट मार्गावर तिकिटांचा प्रारंभिक दर फक्त ६८९ रुपये आहे. या मार्गावरही स्लॅबनुसार दर आठ हजार ७८५ रुपयांपर्यंत जातात. अतिरिक्त शुल्कातही युजर डेव्हलपमेंट फी, विमान सुरक्षा शुल्क आणि पाच टक्के जीएसटी चा समावेश आहे.

प्रवाशांसाठी स्वस्त व सोयीस्कर पर्याय

सोलापूर विमानतळाच्या या सेवेमुळे प्रवाशांना जलद आणि किफायतशीर प्रवासाचा आनंद घेता येणार आहे. या मार्गावर महाराष्ट्र शासनाच्या व्हायबिलिटी गॅप फंडिंग आणि 'रीजनल कनेक्टिव्हिटी योजना' अंतर्गत विमान सेवा देण्याचा प्रस्ताव केंद्रात असल्याने काही मागाँवर फक्त जीएसटी लागू होतो, ज्यामुळे प्रवास अधिक परवडणारा ठरतो.

अशी आहे वेळ

सोलापूर ते मुंबई

मुंबई ते सोलापूर निघण्याची वेळ : सकाळी ११:५५ पोहोचण्याची वेळः दुपारी १:४५

सोलापूर ते मुंबई

निघण्याची वेळ: सकाळी ९:४०

पोहोचण्याची वेळ: सकाळी ११:२०

गोवा ते सोलापूर

गोवा ते सोलापूर निघण्याची वेळ: सकाळी ८:०० पोहोचण्याची वेळ: सकाळी ९:१०

सोलापूर ते गोवा

निघण्याची वेळः दुपारी २:१५ पोहोचण्याची वेळः दुपारी ३:३०

solapur news
नवी मुंबई विमानतळाच्या धावपट्टीची चाचणी यशस्वी; हवाई दलाच्या विमानाचे लँडिंग

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news