Solapur Vande Bharat Express: सोलापूरवरून मुंबई-बंगळूर स्लीपर वंदे भारत

प्रशासनाकडून तयारी सुरू; आरएसीला स्थान नाही, फक्त कन्फर्म तिकिटावरच प्रवास
Solapur Vande Bharat
Solapur Vande Bharat
Published on
Updated on

सोलापूर : मुंबई व बंगळूर या दोन शहरांना सोलापूरमार्गे जोडणारी वातानुकूलित नवीन स्लीपर वंदे भारत एक्स्प्रेस सुरू करण्याच्या हालचाली रेल्वे प्रशासनाकडून सुरू आहेत. मुंबई ते बंगळूर या मार्गावर धावणारी ही सेमी हायस्पीड रेल्वे येत्या ऑक्टोबर २०२६ पासून सेवेत दाखल करण्याच्या दृष्टीने वरिष्ठ स्तरावरून नियोजन केली जात आहे.

या प्रस्तावित रेल्वे सेवेमुळे सोलापूरसह या मार्गावरून प्रवास करणार्या प्रवाशांना मुंबई व बंगळूर यादरम्यानचा अधिक वेगवान, आरामदायी व वातानुकूलित रेल्वे प्रवासाचा पर्याय उपलब्ध होईल. ही स्लीपर कोचची सुविधे्च रेल्वे असल्याने रात्रीच्या प्रवासासाठीही ती उपयुक्त ठरण्याची शक्यता आहे. या गाडीच्या आरक्षण व्यवस्थेबाबतही महत्त्वाचा बदल प्रस्तावित आहे. वंदे भारत स्लीपरमध्ये आरएसीची सुविधा उपलब्ध नसून प्रवासासाठी केवळ पूर्णपणे कन्फर्म तिकीट असणे आवश्यक असणार आहे. त्यामुळे प्रतीक्षा यादीतील प्रवाशांना आरक्षणाची खात्री झाल्याशिवाय यातून प्रवास करता येणार नाही.

मुंबई-बंगळूर या मार्गावरील प्रवाशांची वाढती मागणी लक्षात घेता. ही सेवा सुरू करण्याचा रेल्वेचा प्रयत्न आहे. अंतिम वेळापत्रक, थांबे, भाडे व आरक्षणाची तारीख याबाबत रेल्वेकडून अधिकृत घोषणा होणे अपेक्षित आहे.

वेळीच बर्थची स्थिती कळेल

स्लीपर वंदे भारतमध्ये आरएसीची सुविधा नसणार. केवळ कन्फर्म बर्थ उपलब्ध असेल तर प्रवाशांना तिकीट मिळणार आहे. त्यामुळे प्रवाशांना आरक्षणाच्या वेळी बर्थची स्थिती स्पष्टपणे कळेल.

प्रवास अधिक वेगवान व आरामदायी

सोलापूरमार्गे धावणारी ही स्लीपर वंदे भारत सुरू झाल्यास मुंबई-बंगळूरचा प्रवास अधिक वेगवान व आरामदायी होईल. नोकरी, व्यवसाय, शिक्षण व वैद्यकीय उपचारासाठी प्रवास करणाऱ्यांना याचा लाभ होणार आहे.

सहा दिवस सोडण्याचे नियोजन

१६ डब्यांच्या या रेल्वेमध्ये ११ एसी ३-टियर, ४ एसी २-टियर आणि १ फर्स्ट क्लास अशा पध्दतीने कोचची सुवस्था असेल. तसेच, ही रेल्वे आठवड्यातून सहा दिवस सोडण्याचे रेल्वे प्रशासनाचे नियोजन आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news