Solapur Moulana Minor Molestation: अल्पवयीन मुलीचा विनयभंग केल्याप्रकरणी सोलापुरात एका मौलाना विरुद्ध गुन्हा दाखल

Solapur Moulana Minor Molestation
Solapur Moulana Minor Molestationpudhari
Published on
Updated on

Solapur Moulana Minor Molestation: सोलापुरातील एका मौलानाविरूद्ध अल्पवयीन मुलीचा विनभंग केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सोलापूर एमआयडीसी पोलिसांनी त्याला अटक देखील केली आहे. मदरशात धार्मिक शिक्षणासाठी आलेल्या अल्पवयीन मुलीला चुकीच्या पद्धतीनं स्पर्श करून विनभंग केल्याचा आरोप या मौलानाविरूद्ध करण्यात आला आहे. या प्रकरणी मौलाना मोहम्मद उमर रिझवी याच्याविरूद्ध गुन्हा नोंद करण्यात आला आहे.

Solapur Moulana Minor Molestation
Solapur shocking News | बोरामणीत तिहेरी हत्याकांड; मालमत्तेच्या वादातून आईसह दहावीतील मुलगा व बारावीतील मुलीचा खून!

आरोपी मोहम्मद उमर रिझवी हा मुळचा उत्तर प्रदेशचा असून तो गेल्या काही वर्षांपासून सोलापुरात वास्तव्यास आहे. रविवारी सायंकाळी पीडित मुलगी धार्मिक शिक्षणासाठी आली असता आरोपीने मुलीला चुकीच्या पद्धतीनं स्पर्श केला. ही बाबत पीडित मुलीने कुटुंबियांना सांगितली. त्यानंतर कुटुंबियांनी पोलिसात धाव घेत आरोपी उमर रिझवीविरूद्ध तक्रार दाखल केली.

Solapur Moulana Minor Molestation
Ratnagiri crime news | अल्पवयीन मुलीशी बालविवाह करून अत्याचार

यानंतर सोलापूर एमआयडीसी पोलीस ठाण्यात या प्रकरणी गुन्हा नोंद करण्यात आला असून पोक्सो (POCSO) अंतर्गत हा गुन्हा दाखल झाला आहे. दरम्यान, आरोपी उमर रिझवीला न्यायालयात हजर केलं असता त्याला दोन दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news