Solapur shocking News | बोरामणीत तिहेरी हत्याकांड; मालमत्तेच्या वादातून आईसह दहावीतील मुलगा व बारावीतील मुलीचा खून!

शुक्रवारी मध्यरात्रीच्या सुमारास घडलेल्या घटनेने सोलापूरमध्ये खळबळ, मुलग्याने दहावीची व मुलीन नुकतीच दिली होती बारावीची परीक्षा
Solapur shocking News  | बोरामणीत तिहेरी हत्याकांड; मालमत्तेच्या वादातून आईसह दहावीतील मुलगा व बारावीतील मुलीचा खून!
Published on
Updated on

कासेगाव ; दक्षिण सोलापूर तालुक्यातील बोरामणी येथे मालमत्तेच्या वादातून एकाच कुटुंबातील आई व तिच्या दोन मुलांची धारदार शस्त्राने निर्घृण हत्या झाल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. शुक्रवारी मध्यरात्रीच्या सुमारास घडलेल्या या तिहेरी हत्याकांडाने जिल्ह्यात एकच खळबळ उडाली असून परिसरात भीतीचे वातावरण पसरले आहे.

गायत्री सुधाकर मस्के (आई), प्रिया सुधाकर मस्के (मुलगी) आणि शिवराज सुधाकर मस्के (मुलगा) अशी मृतांची नावे आहेत. मिळालेल्या माहितीनुसार, अज्ञात हल्लेखोरांनी मध्यरात्री मस्के कुटुंबाच्या घरात घुसून तलवारीसारख्या धारदार शस्त्राने सपासप वार केले. या भीषण हल्ल्यात तिघांचाही जागीच मृत्यू झाला.

शनिवारी सकाळी घटना उघडकीस आल्यानंतर गावात एकच खळबळ उडाली. गायत्री मस्के व त्यांची मुलगी प्रिया यांचे मृतदेह घराच्या गच्चीवर रक्ताच्या थारोळ्यात आढळून आले, तर शिवराजचा मृतदेह बैठकीच्या खोलीत सापडला. मृतदेहांवरील जखमांवरून हल्लेखोरांनी अत्यंत क्रूरपणे वार केल्याचे स्पष्ट होत आहे.

Solapur shocking News  | बोरामणीत तिहेरी हत्याकांड; मालमत्तेच्या वादातून आईसह दहावीतील मुलगा व बारावीतील मुलीचा खून!
Solapur Crime : शिवीगाळ केल्याने तरुणाचा डोक्यात दगड घालून खून

मृत प्रिया ही बारावीची विद्यार्थिनी होती, तर शिवराज दहावीत शिक्षण घेत होता. दोघांनीही नुकत्याच बोर्डाच्या परीक्षा दिल्या होत्या. एका हसत्या-खेळत्या कुटुंबाचा असा दुर्दैवी अंत झाल्याने ग्रामस्थांमध्ये तीव्र हळहळ व्यक्त होत आहे.

घटनेची माहिती मिळताच सोलापूर तालुका पोलिस ठाण्याचे पथक व वरिष्ठ अधिकारी घटनास्थळी दाखल झाले. ठसेतज्ज्ञ व श्वानपथकाच्या मदतीने तपास सुरू करण्यात आला आहे. प्राथमिक तपासात ही हत्या मालमत्तेच्या वादातून झाल्याचा संशय व्यक्त केला जात असून, हल्लेखोर हे घरातील किंवा परिचयातील असावेत, असा अंदाज पोलिसांनी व्यक्त केला आहे.

दरम्यान, या घटनेमुळे कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला असून गावात तणावपूर्ण शांतता आहे. आरोपींच्या शोधासाठी विशेष पथके रवाना करण्यात आली असून पुढील तपास सुरू आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news