Solapur Farmer Death | शेतातील विद्युत मोटार सुरू करताना शेतकऱ्याचा विजेच्या धक्क्याने मृत्यू

मोहोळ तालुक्यातील वडवळ येथे शेतातील पाण्याची विद्युत मोटार सुरू करताना दुर्घटना
Mohol Farmer Dies Electric Shock
सोमनाथ कांतीलाल मोरेPudhari
Published on
Updated on

Mohol Farmer Dies Electric Shock

पोखरापूर : मोहोळ तालुक्यातील वडवळ येथे शेतातील पाण्याची विद्युत मोटार सुरू करण्यासाठी गेलेल्या ३२ वर्षीय शेतकऱ्याचा विजेच्या धक्क्याने मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना मंगळवारी (दि. ५ ऑगस्ट) सायंकाळी सुमारे ७ वाजण्याच्या सुमारास घडली. सोमनाथ कांतीलाल मोरे (वय ३२) असे मृत शेतकऱ्याचे नाव आहे.

मोहोळ पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सोमनाथ मोरे हे वडवळ (ता. मोहोळ) येथे कुटुंबासह वास्तव्यास असून शेती करून उदरनिर्वाह करत होते. गेल्या सात वर्षांपासून ते संजय मोरे यांच्या शेतात शेतीची कामे करत होते. कुटुंबीय शेतातील वस्तीवरच राहत आहेत.

Mohol Farmer Dies Electric Shock
Solapur Municipal Corporation: पालिकेच्या स्‍थगितीनंतरही होटगी रस्‍त्याचे काम सुरूच

मंगळवारी सायंकाळी शेतातील विहिरीवरील पाण्याची विद्युत मोटार सुरू करण्यासाठी सोमनाथ शेतात गेले होते. मात्र, बराच वेळ उलटूनही ते परत न आल्याने त्यांची पत्नी काजल मोरे या त्यांचा शोध घेण्यासाठी विहिरीजवळ गेल्या. तेव्हा मोटारच्या विद्युत नियंत्रण पेटीजवळ सोमनाथ बेशुद्ध अवस्थेत पडलेले असल्याचे त्यांना दिसून आले. त्यांनी तातडीने आरडाओरडा करून वस्तीवरील इतर कुटुंबीयांना याची माहिती दिली.

यानंतर कुटुंबीय आणि ग्रामस्थांनी घटनास्थळी धाव घेत सोमनाथ यांना तत्काळ खासगी वाहनातून उपचारासाठी ग्रामीण रुग्णालय, मोहोळ येथे दाखल केले. मात्र, तपासणीअंती वैद्यकीय अधिकाऱ्यांनी उपचारापूर्वीच त्यांचा मृत्यू झाल्याचे घोषित केले. या प्रकरणी मृताचे भाऊ रवींद्र कांतीलाल मोरे यांनी मोहोळ पोलीस ठाण्यात फिर्याद दिली असून, घटनेचा पुढील तपास मोहोळ पोलीस करीत आहेत.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news